आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ सर्वेक्षणासाठी आवश्यक स्वच्छता अॅपचे सर्व्हर डाऊन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात पुढील महिन्यात केंद्रीय पथकाकडून स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याची शेवटची तारीख असून अजून चार हजार नागरिकांनी अॅप डाऊनलोड करणे बाकी आहे. शनिवारी अॅपचे सर्व्हर डाऊन झाले होते. त्यामुळे अनेकांना अॅप डाऊनलोड करता आले नाही. 


यावेळी गुणतालिकेतील बदलासह निगेटिव्ह मार्किंगमध्ये बदल केले आहेत. कागदोपत्री अहवाल आणि प्रत्यक्ष पाहणीत तफावत आल्यास जास्तीचे गुण कमी होणार आहेत. त्यामुळे कागदोपत्री अहवाल तयार करताना महापालिका प्रशासन काळजी घ्यावी लागणार आहे. मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात दोन हजार गुणांची स्पर्धा होती. यात ४५ टक्के गुण हे कागदोपत्री अहवालासाठी होते, तर नागरिकांच्या सहभागास ३० टक्के आणि प्रत्यक्ष पाहणीला २५ टक्के गुण होते. यावेळी एकूण चार हजार गुणांची स्पर्धा होणार असून कागदोपत्री अहवालाचे गुण १० टक्क्यांनी कमी करून नागरिकांचा सहभाग आणि प्रत्यक्ष पाहणीत प्रत्येकी टक्के वाढ केली आहे. आता ४५ ऐवजी ५५ टक्के गुण हे कागदोपत्री अहवालासाठी असतील. ३५ टक्के गुण नागरिकांचा सहभाग आणि ३० टक्के गुण हे प्रत्यक्ष पाहणीला आहे. अॅप डाऊनलोड करण्यासाठी १५० गुण तर त्यावरील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी १५० गुण असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...