आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- तब्बल तीन वर्षांच्या शिव छत्रपती क्रीडा पुरस्कारांची घाेषणा साेमवारी करण्यात येईल, अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. यामध्ये २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ या वर्षातील पुरस्कार विजेत्यांचा समावेश असेल. मागील चार वर्षांपासून या पुरस्कारांची घाेषणा करण्यात अाली नव्हती. त्यामुळे हे पुरस्कार रखडले होते.
यंदा ‘गेट वे अाॅफ इंडिया’वर विजेत्यांचा गाैरव
यंदा प्रथमच क्रीडा मंत्री विनाेद तावडे यांनी मुंबई येथील गेट वे अाॅफ इंडिया’वर पुरस्कार विजेत्यांच्या गाैरव साेहळ्याचे अायाेजन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला अाहे. यासाठी १७ फेब्रुवारी राेजी हा साेहळा अायाेजित हाेईल. त्यांचा हा निर्णय काैतुकास्पद ठरला अाहे. यापूर्वी, अशा प्रकारे गाैरव साेहळा झालेला नाही.
यंदापासून जीवन गाैरवसाठी तीन लाख
क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या (६० वर्षांवरील) व्यक्तींना जीवनगाैरव पुरस्काराने गाैरवण्यात येते. यंदा या पुरस्काराच्या बक्षीस रकमेत वाढ झाली अाहे. अाता ही रक्कम ३ लाख असेल. या पुरस्कार विजेत्याचा मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच इतर पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी एक लाखाचे बक्षिस देण्यात येइल.
क्रीडा पत्रकारांना शिव छत्रपती पुरस्कार देण्याची नुसतीच घाेषणा!
राज्यात क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी नव्याने याेजना अाणि माेहिमा राबवण्याची क्रीडा मंत्री विनाेद तावडे यांच्याकडून नुसतीच वल्गना ठरत अाहे. याचाच प्रत्यय त्यांनी गत वर्षी केलेल्या घाेषणेतून सहजरीत्या येताे. त्यांनी २३ अाॅक्टाेबर २०१७ राेजी अाता महाराष्ट्रातील क्रीडा पत्रकारांनाही शिव छत्रपती पुरस्काराने यंंदापासून गाैरवण्यात येईल,अशी घाेषणा केली हाेती. मात्र, त्यांची ही घाेषणा हवेतच विरली. कारण,यासंबंधीचा काेणत्याही प्रकारचा शासन निर्णय काढण्यात अाला नाही. त्यामुळे तावडे यांची ही नुसतीच घाेषणा ठरल्याचे दिसून येते.
शासनातर्फे 1969-70 पासून ही योजना सुरू करण्यात आली. वैयक्तिक व सांघिक खेळांमध्ये सलग तीन वर्षे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. प्रशिक्षक, संघटक, कार्यकर्त्यांबरोबरच अनेक वर्षे क्रीडा क्षेत्रात अहोरात्र मेहनत करीत खेळाडू घडविणाऱ्या ज्येष्ठ संघटकांना जीवनगौरव पुरस्कारही सुरू करण्यात आला आहे. महिला संघटकांकरिता जिजामाता पुरस्कार हा स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्यात आला. शारीरिकदृष्टय़ा दिव्यांग असलेल्या खेळाडूंकरिता एकलव्य पुरस्कार, तर साहसी क्रीडा प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्यांसाठी साहसी क्रीडा पुरस्कार देण्यात येतो.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.