आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवशाही बस मिळणार ५४ रुपये प्रतिकिलोमीटर प्रासंगिक करारावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्य परिवहन महामंडळाची आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्य अशी संपूर्ण वातानुकूलित ‘शिवशाही’ बस लग्न समारंभ, साखरपुडा, बारसे अशा समारंभासाठी सर्वसामान्यांना रु. ५४ प्रतिकिलोमीटर अशा दराने प्रासंगिक करारावर देण्यात येणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक नुकतेच एसटी प्रशासनाने सर्व आगारांना पाठवून दिले आहे. 


लग्न समारंभाचे वऱ्हाड एसटीने घेऊन जाणे एकेकाळी प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात होते. कालांतराने लग्नाचे जसे ‘बजेट’ वाढले तसे वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाण्यासाठी चांगल्या आरामदायी बसेसची मागणी होऊ लागली. शिवशाही बसचे आगमन होताच अनेकांनी या बसेस लग्नसराईसाठी प्रासंगिक करारावर विचारणा सुरू केली. यंदाचा लग्नाचा ‘सीझन’ नुकताच सुरू झाल्यामुळे तो ‘कॅश’ करण्याच्या हेतूने राज्य परिवहन महामंडळाने डिसेंबरपासून शिवशाही ही ४५ आसनी बस रु. ५४/- प्रतिकिमी. दराने प्रासंगिक करारावर देण्याचे ठरविले आहे. 


किमान ३५० किमीचे भाडे देऊन होईल करार 
दिवसालाकिमान ३५० कि.मी.चे भाडे भरून प्रचलित प्रासंगिक करार पद्धतीनुसार ही बस भाड्याने घेता येईल. याच बरोबर धार्मिक यात्रा, सहल इतर कारणांसाठी समूहाने जाणाऱ्या लोकांसाठी ही बस प्रासंगिक करारावर उपलब्ध होणार असून सध्या ज्या आगाराकडे या बसेस उपलब्ध आहेत,त्या आगारात याबाबत अधिक चौकशी करून नोंदणी करता येईल. 

बातम्या आणखी आहेत...