आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल इंजिनिअरिंगमुळे राष्ट्रवादीचा 100% उत्कर्ष; सतिश चव्हाण यांचे वर्चस्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभेच्या १० पैकी १० जागा राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत ‘उत्कर्ष’ने जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. राखीव प्रवर्गातील सर्वच पाच जागा तर विक्रमी मतांनी जिंकल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गाच्या पाच जागांसाठी मात्र चुरशीची लढत झाली. त्यामुळे विजयी उमेदवार घोषित करण्यासाठी दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत सुमारे आठ तासांपेक्षा अधिक वेळ गेला. प्रा. सुनील मगरे,नरेंद्र काळे आणि डॉ. भारत खैरनार या तीन दिग्गजांनीही विजय मिळवला. राखीव प्रवर्गाव्यतिरिक्त सर्वसाधारण प्रवर्गातही सोशल इंजिनिअरिंग केल्यामुळे उत्कर्षला मतदारांनी पसंती दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. 


पदवीधर अधिसभेच्या १० जागांसाठी डिसेंबरला ८३ केंद्रांवर मतदान झाले होते. २९ हजार मतदारांपैकी या वेळी ५८ टक्के मतदान नोंदवले गेले होते. पहिल्यांदाच पदवीधर अधिसभेच्या दहा जागा आहेत. त्यासाठी डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र पहिला निकाल हाती येण्यासाठी बारा तास लागले. अनुसूचित जाती प्रवर्गातून उत्कर्षचे उमेदवार तथा मुप्टा या संघटनेचे संस्थापक सचिव प्रा. सुनील मगरे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. १४ हजार ४४५ वैध मतांपैकी हजार २२३ चा कोटा विजयासाठी ठरवला होता. प्रा. मगरे यांनी मात्र हजार ५०४ मते घेतली. भाजपप्रणीत विद्यापीठ विकास मंचचे पंकज भारसाखळे (१९०४) यांचा त्यांनी दारुण परभाव केला. त्यानंतर रात्री उशिरा अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी मतमोजणी करण्यात आली. या गटातही उत्कर्षच्या सुनील निकम (९४२१) यांनी राजू सूर्यवंशीचा (२८५६) यांचा पराभव केला. भागवत बर्डे यांना फक्त हजार ६५६ मतांवर समाधान मानावे लागले. 


अशी झाली मतमोजणी 
- सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर 
- ०४ शिफ्टमध्ये मतमोजणी
- २७ टेबल्स मतमोजणीसाठी
- ५०० कर्मचारी मतमोजणीसाठी 


भाजपने पक्षपात केला, पण जिंकलो आम्हीच! 
अगदी मतदारनोंदणीपासून ते मतदान होईपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक यंत्रणेला अक्षरश: ताब्यात घेऊन पक्षपाताचा प्रयत्न केला. डॉ. सुनील देशपांडेंसारख्यांना निवडणूक समितीचे प्रमुख केले. त्यांनी खूप घोळ करून ठेवले. निवृत्त असताना खुर्चीचा मोह सुटलेल्या डॉ. सर्जेराव ठोंबरेंनी कुलगुरूंना दबावात घेऊन विजयश्री मिळवण्याचा प्रयत्न केला. पण मराठवाड्यातील मतदार धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा आहे. त्यामुळे जातीपातीचे राजकारण लाथाडले. कुलगुरूंनी नॅक असलेल्या महाविद्यालयांना केंद्र नाकारले. पण जिंकलो आम्हीच. 
- सतीश चव्हाण, मार्गदर्शक, उत्कर्ष 


नियोजन पैशांत कमी पडल्याने अपयश 
आम्ही उमेदवार चांगले दिले होते. पण बहुतांश जण नवखे होते. आम्ही नियोजन पैशांत कमी पडलो. त्यामुळे अपयश आलेे. प्रस्थापितांनी दिलेल्या भूलथापांमुळे हा निकाल हाती आला आहे. 
-डॉ.गजानन सानप, निमंत्रक, विद्यापीठ विकास मंच 


सोशल इंजिनिअरिंग असे 
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त, इतर मागासवर्गीय प्रवर्ग आणि महिलांसाठी तर प्रत्येकी एक जागा आरक्षित होतेच. येथे उत्कर्षने पाचही उमेदवार विजयी करून मागासांना प्रतिनिधित्व दिले. सर्वसाधारण पाच जागांसाठी उमेदवार देताना उत्कर्षने येथेही भटके विमुक्त, एक मुस्लिम तर एक ओबीसी उमेदवार दिला. मराठा समाजाला अत्यंत नगण्य स्थान दिले होते. उस्मनाबाद, जालना, बीड आणि औरंगाबादेतून उत्कर्षच्या उमेदवारांना भरभरून मतदान झाले. 


दुसऱ्या पसंतीने घेतले आठ तास 
सर्वसाधारणप्रवर्गासाठी २४५४ मतांचा विजयी कोटा ठरवला होता. ३३ उमेदवार रिंगणात असले तरीही विद्यापीठ विकास मंच आणि उत्कर्षच्या उमेदवारांतच प्रमुख लढती झाल्याचे चित्र होते. पहिल्या पसंतीचे नरेंद्र काळे यांना हजार २३५ मते मिळवून प्रथम स्थान राखलेे. तर भारत खैरनार यांनी १९३६ मते घेऊन दुसरे स्थान पटकावले. उत्कर्षचेच रमेश भुतेकर यांनी १४८० मते घेतली. शेख जहूर खालिद यांनी १४७८ तर उस्मानाबादचे संभाजी भोसले यांनी १३३४ मते मिळवली होती. पंडित तुपे यांना ९३२ मते मिळवून ते सहाव्या स्थानी होते. दुसऱ्या पसंतीअखेर पहिल्या उमेदवारांच्या विजयाची शक्यता आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीअखेर रात्री उशिरापर्यंत ३३ पैकी २२ जण वगळले होते. 

बातम्या आणखी आहेत...