आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पा सेंटर सेक्स रॅकेट प्रकरण: चौकशीसाठी मिळेना दुभाषक, पोलिसांची मोठी पंचाईत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्रोझोन मॉलमधील स्पा सेंटर सेक्स रॅकेट प्रकरणात थायलंडच्या मुलींची चौकशी करण्यासाठी दुभाषकच मिळत नसल्याने पोलिसांची मोठी पंचाईत होत आहे. प्रकरण उघडकीस येऊन आठ दिवस उलटूनही दुभाषक मिळत नसल्याचे चौकशी पुढेच सरकत नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मराठवाड्यात थायी भाषा येत असलेला एकही तज्ज्ञ भेटल्याने अखेर गुरुवारी पुणे विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 


माॅलमधील स्पा सेंटरमध्ये देहविक्री सुरू असल्याचा प्रकार डिसेंबर रोजी उघडकीस आला. यात देहविक्रीसाठी आणलेल्या थायलंडच्या मुलींना ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी पोलिस आयुक्तालयात उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात यांनी नऊ मुलींशी बोलण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून थोडी थायी भाषा अवगत असलेल्या एकाला बोलावले होते. परंतु त्यातून फारसे निष्पन्न होऊ शकले नाही. त्यामुळे ठोस माहितीसाठी तज्ज्ञच आवश्यक असल्याने पुणे विद्यापीठाशी संपर्क करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मुली राहत असलेला फ्लॅट मुंबईच्या अल्ताफ नामक व्यक्तीच्या नावावर असून त्याच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेची दोन पथके तपास करत आहेत. 


केवळ पाचवीपर्यंत शिक्षण, इंग्रजीही येत नाही
नऊ मुली या अत्यंत गरीब घरच्या असून केवळ पाचवीपर्यंत शिकलेल्या आहेत. थायलंडच्या स्थानिक एजंटकडून त्यांना कामाचे दुप्पट पगाराचे आमिष दाखवून भारतात आणले जाते. दर तीन महिन्यांनी अशा प्रकारे मुलींचे गट भारतात अाणून त्यांच्याकडून देहविक्री केली जात असल्याचे गुरुवारी उपायुक्त धाटे यांनी केलेल्या चौकशीतून समोर आले. 

बातम्या आणखी आहेत...