आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच मिनिटांत 15 लाख रुपये लंपास;फायनान्स कंपनीतील प्रकार, कार्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- मायक्रो फायनान्सचे कर्मचारी चहा घेण्यासाठी गेले  असता याच पाच मिनिटांत १५ लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची बाब सोमवारी घडली. पैठण शहरातील गोदावरी काॅलनीत अन्नपूर्णा मायक्रो फायनान्स प्रा.लिमिटेड कंपनी कार्यालयाच्या दरवाज्याचे कुलूप तोडून कपाटातील १४ लाख ९८ हजार रुपये  चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सकाळी दहा वाजे दरम्यान घडली.    


 या चोरीच्या घटनेची माहिती कंपनी व्यवस्थापक इरफान सय्यद यांनी पैठण पोलिस ठाण्यात दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, पोलिस निरीक्षक चंदन इमले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उशिरापर्यंत  फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.  कंपनीचे  पैठण शाखा व्यवस्थापक इरफान सय्यद यांनी  सांगितले की, सकाळी इरफान सय्यद व एक कर्मचारी आम्ही जवळच्या हाॅटेलमध्ये चहा, नाष्टासाठी गेले होतो, याच ५ मिनिटांत चोरट्यांनी ही चोरी केली. अन्नपूर्णा मायक्रो फायनान्स प्रा. लिमिटेड कंपनी ओडिशा राज्यातील आहे. नाॅन फायनान्स कंपनी असून फक्त महिला बचत गटाला ही कंपनी फायनान्स करते. दीड वर्षापासून अन्नपूर्णा पैठण तालुक्यात महिला बचत गटाला कर्ज वाटप करत आहे. या कंपनीचे खाते शहरातील आयसीअायसीआय या बँकेत आहे. रोज जमा झालेली रक्कम बँकेत भरली जाते. मात्र, शनिवार व रविवार दोन दिवस बँकेला सुटी असल्यामुळे कार्यालयाच्या कपाटात १४ लाख ९८ हजार ६५ रुपये ठेवल्याचे इरफान सय्यद यांनी सांगितले. गोदावरी काॅलनीत अंकुश राक्षे याचा बंगला आहे. या बंगल्यात या कंपनीचे कार्यालय व कर्मचारी निवासस्थान आहे. या बंगल्यावर दोन किरायादार व स्वत: घर मालक राहतात. 

 

 सुरक्षा नाही
पंधरा लाख रुपये एवढी मोठी रक्कम साध्या कपाटात ठेवण्यात आली होती. यात या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही. यातून ही चोरी दिवसा घडल्याचे बोलले जाते. पैठणमध्ये अनेक अशा कंपन्या असून त्यांच्याकडेही सुरक्षा रक्षक नसल्याने मायक्राे फायनान्स कंपन्यांच्या सुरक्षा संदर्भात प्रश्न निर्माण झाले आहेत.  

बातम्या आणखी आहेत...