आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना रोड, व्हीआयपी रोडवरील निम्मे दिवे बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जालना रोडवरील नगर नाका ते चिकलठाणा आणि मध्यवर्ती बसस्थानकापासून ते हर्सूल टी पाॅइंट या व्हीआयपी रोडवरील निम्मे पथदिवे बंद असून त्यामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. एलईडी दिवे बसवण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून त्याच्या सोयीनुसार पथदिवे बसवण्यात येत असल्यामुळे शहरातील हे प्रमुख दोन रस्ते अंधारात आहेत.

 
एलईडी प्रकल्प सुरू असल्याने जुन्या दिवे दुरुस्ती बंद केली होती. याबाबत नगरसेवकांनी स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत अनेकदा ओरड केली होती. अगोदर जिथे अंधार आहे, त्या ठिकाणी नवीन पथदिवे बसवा अन्यथा तिथे दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी विद्युत विभागाला आदेश देऊन जेथे अंधार आहे, तेथे दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही प्रमाणात कामे सुरू झाली. मात्र मुख्य रस्त्यावर बंद असलेले दिवे अद्यापही बदलण्यात आले नाहीत. त्यामुळे मुख्य रस्त्यावरच अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. महापौरांनी विद्युत विभागाला आदेश देऊनही दुरुस्तीचे काम झाले नसल्यामुळे शनिवारी त्यांनी आयुक्तांना पत्र लिहून पथदिवे दुरुस्तीची सूचना केली. 

बातम्या आणखी आहेत...