आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांपत्यासह चार कर्जबाजारी तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्या; तिघांचे वय 35 पेक्षा कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-  ४० हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीनंतरही मराठवाड्याच्या गळ्याला शेतकरी आत्महत्येचा फास कायम आहे. विभागात एका कर्जबाजारी शेतकरी दांपत्यासह ४ युवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव सोमवारी समोर आले. 
 

उमरगा : पेटवून घेत दांपत्याची अात्महत्या
उमरगा- 
तालुक्यातील बोरी येथे सचिन नामदेव मदने (३५) व पत्नी छबुबाई सचिन मदने (३२) यांनी सोमवारी सकाळी घराचा दरवाजा बंद करून स्वतःला पेटवून घेतले. उपचारांदरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसानुसार दांपत्यावर सुमारे ४ लाखांचे खासगी व बँकेचे कर्ज आहे. 


बीड : शेतकरी पत्नीचा घरातच गळफास
वडवणी-
कर्जमाफीसाठी पात्रता यादीत नाव न आल्याच्या निराशेतून मुक्ता मधुकर उजगरे या शेतकरी पत्नीने सोमवारी घरातच पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. पती मधुकर यांच्यावरील ५७ हजारांचे कर्ज कर्जमाफीत माफ होईल, अशी त्यांना आशा होती. परतफेडीच्या विवंचनेतून मुक्ता यांनी आत्महत्या केली.  


परभणी : परतफेडीच्या चिंतेने गळफास 
कवडधन (सेलू) येथील गोपाळ अमृतराव काकडे (३२) या शेतकऱ्याने रविवारी बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर एसबीआय व देना बँकेचे कर्ज होते. वेळेवर परतफेड होत नसल्याने ते चिंताग्रस्त होते.

बातम्या आणखी आहेत...