आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता अॅपमधील तांत्रिक बिघाडाने मनपाची डोकेदुखी आणखी वाढली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- स्वच्छता अॅपमधील उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिकेने केलेल्या पूर्ण मेहनतीवर वेबसाइटवरील तांत्रिक अडचणीमुळे पाणी फेरले आहे. २५ हजार नागरिकांना स्वच्छता अॅपशी जोडण्याचे उद्दिष्ट ठरवून पालिकेने २१ हजारांपर्यंत मजल मारली होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे अकरा हजारांचा आकडा शासनाच्या वेबसाइटवर नोंदच झाला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा पालिकेला उद्दिष्टपूर्तीसाठी कसरत करावी लागत आहे. 


साधारणतः फेब्रुवारीमध्ये केंद्रीय पथक स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत शहरात तपासणीसाठी येणार आहे. तत्पूर्वी, ३१ जानेवारीपर्यंत स्वच्छ सर्वेक्षणाशी निगडित प्रत्येक बाबीवर पालिकेला काम करावयाचे आहे. स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावरील तक्रारी सोडवणे हा यातला प्रमुख भाग आहे. 


शहराच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत किमान २५ हजार नागरिकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड करणे अपेक्षित आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिका प्रशासनाने डिसेंबरमध्ये पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्येकाने किमान १० नागरिकांकडून स्वच्छता अप डाऊनलोड करून घेण्याचे टार्गेट दिले. २९ डिसेंबरपर्यंत २१ हजार नागरिकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी तांत्रिक अडचणीमुळे शासनाच्या वेबसाइटवर प्रारंभीच्याच १० हजार नागरिकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड केल्याचे नमूद केले. उर्वरित १२ हजार नागरिकांची नोंदणी वेबसाइटवर झालेलीच नाही. पालिकेने यासंबंधी तक्रार केली. परिणामी या कामासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाल्याचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...