आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रधारी दरोडेखोरांना ग्रामस्थांनीच पकडले; ग्रामस्थ आणि चोरट्यांत सिनेस्टाईल थरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडीगोद्री/सुखापुरी- सुखापुरी येथे मध्यरात्री धारदार शस्त्र हाती घेऊन  चोरीच्या तयारीत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील दोन चोरट्यांना ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी पकडले.   एक चोरटा ग्रामस्थांना धारदार शस्त्राचा धाक दाखवत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. 


 अंबड ते तीर्थपुरी रोडवर सुखापुरी येथे रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास गावात  दुचाकीवरून तीन चोरटे फिरत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले.  हे चोरटे बंद असलेल्या घराशेजारी दुचाकी उभी करून घरफोडी करण्याच्या उद्देशाने चर्चा करीत होते. परंतु, एका सजग नागरिकाच्या हा प्रकार लक्षात आला. चार ते पाच जणांनी  त्यांच्याजवळ जाऊन विचारणा केली असता, चोरट्यांनी धारदार शस्त्रात्रांनी धमकावून ग्रामस्थांशी झटापट केली. यानंतर ग्रामस्थांना हे चोर असल्याचे समजताच ग्रामस्थांनी मोठ्याने आरडाओरड केली. या आवाजाने परिसरातील ग्रामस्थही जागे झाले. यानंतर सर्वांनी एकत्र येऊन चोरट्यांचा सामना करत दोघांना पकडले. चोरटे व ग्रामस्थांच्या झटापटीत एखाद्या चित्रपटासारखा थरार निर्माण झाला होता. यानंतर सुखापुरी येथील पोलिस पाटील इलियास बागवान यांनी रात्री २ वाजेच्या सुमारास गोंदी पोलिसांना बोलावून आरोपींना  पोलिसांच्या स्वाधीन केले.  हेड कॉन्स्टेबल भास्कर आहेर यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि एम. टी. सुरवसे हे करीत आहेत.  

 

तीन तास चालला थरार
ग्रामस्थ  येत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी दुचाकी जाग्यावरच सोडून वेगवेगळ्या दिशेने धावू लागले. परंतू, ग्रामस्थांनी संघटित होऊन अंधारात त्यांचा पाठलाग करुन दोन जणांना पकडून आणले. परंतू, एका चोरट्याने ग्रामस्थांना धारदार शस्त्राचा धाक दाखविल्यामुळे तो पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. हा थरार तब्बल तीन तास चालला.   

 

 

हे आहेत आरोपी  
ग्रामस्थांनी मध्यरात्री पाठलाग करीत अभय जालिंदर वाघ (२०, रा.खळवाडी पाचोड ता.पैठण जि.औरंगाबाद), अमोल देविदास बर्डे (१९, रा.भुमरे गल्ली पाचोड जि.औरंगाबाद)  यांना ताब्यात घेतले तर शरद पवार (रा.भारडी ता. अंबड जि. जालना) हा फरार झाला अाहे.  

बातम्या आणखी आहेत...