आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंजलीकडून आल्याचे सांगत अडीच तोळ्याचे दागिने चोरले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पतंजली कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून दोन चोरट्यांनी घरात घुसून वृद्धेचे अडीच तोळे साेन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना २१ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास छावणीतील गवळीपुऱ्यात घडली. 


उमा श्यामलाल खांडेकर (६०) यांच्या घरी सकाळी अंदाजे २५ ते २७ वयोगटातील दोन तरुण आले. या वेळी उमा यांची सून घरातच होती. तरुणांनी आमच्याकडे दागिने उजळण्याची पावडर असल्याचे सांगितले. उमा यांनी त्यांच्या सुनेच्या कानातले, अंगठी व गळ्यातील चेन असे अडीच तोळ्याचे दागिने दिले. तरुणांनी दागिने घेऊन एका भांड्यात हळदीची पावडर, पाणी टाकून धुणे सुरू केले. या दरम्यान त्यांनी दागिने घेऊन पोबारा केला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...