आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलंब्रीसारखे नदी खोलीकरणासह रुंदीकरणाचे काम कुठेच झाले नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - तालुक्यात जेवढे नदी खोलीकरण व रुंदीकरणाचे कामे झाले आहेत. तेवढी कामे औरंगाबाद जिल्ह्यात कुठेच झाली नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त पाणी साठवणूक करून कमीत कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. ते  वारेगाव येथे आयोजित शाळा खोल्यांच्या लोकार्पण प्रसंगी कार्यक्रमात ते रविवारी बोलत होते.  


या वेळी  फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाठ,औरंगाबादचे उपमहापौर विजय औताडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष दामुआण्णा नवपुते, जिल्हा परिषद सदस्या अनुराधा चव्हाण, शिवाजी पाथ्रीकर, प.स.सभापती सर्जेराव मेटे, उपसभापती एकनाथ धटिंग, वारेगावच्या सरपंच उज्ज्वला बोरसे उपस्थित होते. ते  म्हणाले की, तालुक्यात सार्वजनिक हिताचे कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने विकासाची चिंता न करता आता आपल्या शेतीच्या कमीत कमी क्षेत्रात नवतंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीतजास्त उत्पन्न कसे मिळवता येईल, यासाठी प्रयत्न करावा. पूर्वी शाळेत मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या जास्त असायची. त्यात शासकीय नोकरीत देखील जास्त मुले असायचे.

 

परंतु अलीकडच्या काळात हे समीकरण बदलले आहे. आता उच्च शैक्षणिक क्षेत्रात मुली मुलांच्या तुलनेत पुढे आहे. त्यामुळे शासकीय नोकरी करणाऱ्या मुलींची संख्या देखील वाढत आहे. पुरुषांनी ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. नसता पुढील काळात महिलांचे घरकाम करण्याची वेळ पुरुषांवर येऊ शकते. त्यामुळे मुलांनी शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजेत. तालुक्यात सार्वजनिक हिताच्या कामाची चिंता करण्याची गरज शेतकऱ्यांना राहिलेली नाही. कारण तालुक्यात जलयुक्त शिवार, फुलंब्री पंचायत समितीमार्फत शेतकऱ्यांना सर्वात जास्त ४५० विहिरी दिल्या, ठिबक सिंचनासाठी अनुदान, पीक विमा, बोंडअळीग्रस्त नुकसान केलेल्या कापूस पिकाची नुकसान भरपाई, कर्जमाफी, गावागावात सार्वजनिक सभागृह, ड्रेनेजलाइन, गावागावातील रस्ते, बंद नलिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी.

 

तसेच शेतकऱ्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनेचा फायदा वेळेत घेतला तर कुठल्याही शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची किंवा आत्महत्यांच्या विचारदेखील मनात येणार नाही.   या वेळी नरेंद्र देशमुख, हौसाबाई काटकर, वैशाली चोपडे, विलास उबाळे,  बाळासाहेब तांदळे, विकास गायकवाड, पं.स. सदस्य संजय त्रिभुवन, बाळासाहेब सोटम, गजानन नागरे, राम बनसोड, कैलास सोनवणे, गणेश बोरसे, सुचित बोरसे, नरेंद्र बोरसे, हसन देशमुख, शेषराव जाधव, कैलास सोनवणे उपस्थित होते. प्रास्ताविक नरेंद्र देशमुख यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...