आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या शहरप्रमुखासह पंधरा जणांना अटक; चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केडगाव येथील दोन शिवसैनिकांच्या हत्येनंतर पोलिसांवर झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी आमदार अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड यांच्यासह पंधरा जणांना शुक्रवारी अटक केली. 


केडगाव येथे ७ एप्रिल रोजी पोटनिवडणुकीच्या निकालानंतर केडगाव शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संतप्त जमावाने पोलिस व त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली होती. या प्रकरणी सहायक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह ६०० जणांवर गुन्हे दाखल केले होते. या तोडफोड प्रकरणी ७ मे रोजी ९ शिवसैनिक स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाले होते. १० मे रोजी आणखी सात जणांना अटक करण्यात आली होती. १४ मे रोजी शिवसैनिक मदन आढाव व रवी वाकळे हे पोलिस ठाण्यात हजर झाले होते. शुक्रवारी या दगडफेकप्रकरणी स्वत:हून हजर झालेले शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी आमदार अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड, दीपक खैरे, हर्षवर्धन कोतकर, रमेश परतानी, सुनील सातपुते, देविदास मोढवे, मुकेश जोशी,विजय पठारे, चेतन फसले, चेतन शर्मा, विशाल गायकवाड, शुभम बेंद्रे, अनिल लालबोंद्रे, लंकेश हरबा यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, मृत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर याने कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर, संदीप कोतकर यांच्यासह अन्य काही जणांवर गुन्हे दाखल केले होते. या घटनेतील संशयित असलेला आरोपी भानुदास कोतकर हा फरार झाला होता. केडगाव हत्याकांड प्रकरणी कोतकर याला पोलिसांनी स्टँडिंग वाँरट बजावले होते. त्याचबरोबर कोतकर याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावर १७ मे रोजी सुनावणी होणार होती. मात्र, तत्पूर्वीच पोलिसांनी कोतकरलादेखील अटक केली आहे. या प्रकरणानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलेले आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात केलेल्या तोडफोडप्रकरणी जगताप व कर्डिले यांना अटक करण्यात आली होती. कर्डिले यांना जामीन िमळाला आहे. मात्र, जगताप यांनी जामीन घेण्यास नकार दिला आहे. 


अनिल राठोड, संभाजी कदम फरारच 
पोलिसांसमोर काढलेल्या छायाचित्रात असलेले व पोलिस डायरीत फरार असलेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड व शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम अद्याप फरारच आहेत. 

बातम्या आणखी आहेत...