आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिटी बस चालवण्याची तीन कंपन्यांची तयारी; तीन दिवसांनी होईल निविदांचा निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- स्मार्ट सिटीअंतर्गत खासगी ऑपरेटर कंपनीच्या माध्यमातून शहरात सिटी बस सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी महापालिकेकडे पाच कंपन्यांनी तयारी दर्शवली होती. मनपाने प्रस्ताव मागवल्यानंतर तीन कंपन्या पुढे आल्या. आता कंपन्यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची तीन दिवसांत तपासणी केली जाणार आहे. 


स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन ही विशेष उद्देश वहन(एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यात आली आहे. शासनाने आतापर्यंत या कंपनीला २८३ कोटी रुपयांचा निधी दिला. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात सिटी बस सेवा सुरू केली जाणार आहे. ५ एप्रिल रोजी इच्छुक कंपन्यांनी स्मार्ट सिटीचे नोडल ऑफिसर सिकंदर अली व सीएचटूएमच्या अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण केले होते. 

बातम्या आणखी आहेत...