आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड, तुळजापुरात वीज काेसळून तीन जणांचा मृत्यू, सलग तिस-या दिवशी पाऊस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद - मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना बुधवारी पाऊस, गारपीट व विजांचा तडाखा बसला. वीज कोसळून बीड तालुक्यात एक, तर तुळजापूर तालुक्यात २ जणांचा मृत्यू झाला.
तुळजापूर तालुक्यात अवकाळी सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली.

 

अपसिंगा येथे बुधवारी पहाटे यशवंत राणा क्षीरसागर (६७) घराबाहेर आले असताना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत मंगरूळ येथे सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास नागरबाई मारुती शिनगारे (५५) शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.


दरम्यान, बीड शहर-परिसरात सायंकाळी ५ वाजता मुसळधार पाऊस झाला. घोसापुरी येथील शेतकरी देविदास भानुदास ढेरे (३८) हे शेतात गेले हाेते. सायंकाळी पाच वाजता वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. वीज पडल्यानंतर त्यांना तत्काळ बीड जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...