आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात आज, उद्या अवकाळी पाऊस; पुणे वेधशाळेने वर्तवली शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्यात या आठवड्यात पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. बुधवारी (दि. ७)  दक्षिण कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी तसेच शुक्रवारी ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.  


शनिवारी (दि. १०) दक्षिण कोकण-गोवा, दक्षिण-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.  या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहील. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात मंगळवारी उस्मानाबाद येथे सर्वात कमी १०.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...