आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छावणीत दोन ट्रकच्या मध्ये रिक्षाचा चक्काचूर, चालक गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- छावणीतील पथकर नाक्यावर उभ्या ट्रकला ओव्हरटेक करून जाण्याच्या प्रयत्नात मागून येणाऱ्या ट्रकची धडक बसून रिक्षाचा चक्काचूर झाला. यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


मंगळवारी सायंकाळी शेख मुश्ताक (२५, रा. अन्सार कॉलनी) हा रिक्षाने (एमएच २० डब्ल्यू ४०८५) पडेगाव येथून शहरात येत होता. तेव्हा पथकर नाक्यावर ट्रक (जीजे २५ यू ६५७५) उभा होता. मुश्ताकने बाजूने रिक्षा काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मागून आलेल्या ट्रकने (एपी २९ टीए ५५१३) रिक्षाला जोरात धडक दिली. रिक्षा थेट समोरील ट्रकवर आदळून दोन्ही ट्रकच्या मध्ये चेपला. यात मुश्ताकच्या पायाला गंभीर इजा झाली. विशेष पोलिस अधिकारी शिवाजी गायकवाड, पडेगावचे रहिवासी फुलचंद तुपे, चंद्रकांत पेहरकर, संतोष शिंदे, सागर वडनेरे, विजय मोटे रिक्षाचालकाला तातडीने घाटीत दाखल केले. 

बातम्या आणखी आहेत...