आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद- गोव्यातून स्वस्तात दारू शहरात आणून ती लष्कराची असल्याचे भासवत दुप्पट किमतीने विकणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेेने अटक केली. धूलिंवदनापासून हा प्रकार सुरू होता. संतोष प्रल्हाद जाधव (३६, रा. नागेश्वरवाडी) आणि पुण्यवर्धन चंद्रभान साळवे (२५, रा. एन-९, पवननगर) अशी या दोघांची नावे आहेत.
गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना खबऱ्याकडून या प्रकरणाची माहिती मिळाली होती. बुधवारी मध्यरात्री सोनवणे व पथकाने वाळूज एमआयडीसीतील गुड इयर कंपनीसमोर सापळा रचला होता. अकराच्या सुमारास जाेगेश्वरी गावाकडून दुचाकी व कारने काही जण येत असल्याचे दिसताच पथकाने त्यांना अडवले.
त्यांच्याकडे गोण्यांमध्ये ७५० एमएलच्या गोल्ड अँड ब्लॅक कंपनीची ट्रिपल एक्स रमच्या एकूण ८४ बाटल्या आढळल्या. दारूसाठा, दुचाकी व चारचाकी असा दोन लाखांचा ऐवज जप्त करत एमआयडीसी वाळूज पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सोनवणे, सुभाष शेवाळे, सतीश हंबरडे, विजयानंद गवळी, सिध्दार्थ थोरात, सय्यद अशरफ, नितीन धुळे, शिवा बोर्डे, सुधाकर राठोड, धर्मराज गायकवाड, लालखान पठाण यांनी कारवाई केली.
धूलिवंदनाला फसला सापळा
यात मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संतोषने यापूर्वी नगर येथेही दारू विकल्याचेही समोर आले आहे. खबऱ्याने धूलिवंदनाच्या दिवशीच गुन्हे शाखेला या रॅकेटबाबत माहिती दिली होती. त्यानुसार लावलेला सापळा फसला होता. बुधवारी मात्र दोघेही रंगेहाथ हाती आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.