आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इज्तेमासाठी गुलबर्गा, मुंबईहून दोन विशेष रेल्वे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- लिंबेजळगाव येथे २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय इज्तेमासाठी गुलबर्गा व मुंबईहून विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. गुलबर्गा येथून २३ फेब्रुवारी रोजी ही रेल्वे (गाडी क्र. ०१३२१) दुपारी १२.५५ वाजता सुटेल. सोलापूर, लातूर, परभणी मार्गे २४ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजता औरंगाबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे (गाडी क्र. ०१३२२) औरंगाबाद येथून २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुटेल आणि २७ रोजी सकाळी ११.३० वाजता गुलबर्गा येथे पोहोचेल. 


मुंबई-औरंगाबाद ही विशेष रेल्वे (गाडी क्र. ०११८१) मुंबई येथून २४ फेब्रुवारीला रात्री १२.२० वाजता सुटेल. नाशिक, मनमाड, रोटेगाव मार्गे सकाळी ८.३० वाजता शहरात पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वे (गाडी क्र. ०११८२) औरंगाबाद येथून २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.५० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२० वाजता मुंबईत पोहोचेल.

बातम्या आणखी आहेत...