आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ उपकुलसचिव डॉ. ईश्वर मंझा अटकेत; नोकरी लावून देतो म्हणत केली फसवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सहायक लिपिकाची नोकरी लावून देतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वर रायभान मंझा यांना सोमवारी रात्री १ वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील घरातून अटक करण्यात आली. छावणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर ३ वेळा नोटीस व ४ वेळा निरोप देऊनही ते हजर न झाल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटकेची कारवाई केली. देवनाथ माणिकराव चव्हाण यांनी ३ महिन्यांपूर्वी पोलिस आयुक्तालयात मंझांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली होती. 

 

चव्हाण यांचा लहान भाऊ विजय हा १२ वी पास असून नोकरीच्या शोधात होता. विद्यापीठात सहायक लिपिकपदी किंवा ओळखीच्या कॉलेजमध्ये विजयला नोकरी लावून  देतो हे आश्वासन मंझा यांनी दिले. ६ लाख रुपये लागतील असे सांगितले. चव्हाण यांनी त्यास संमती दिली. आधी ३ लाख, नोकरी लागल्यानंतर ३ लाख देण्याचे ठरले. त्यानंतर चव्हाण यांनी विद्यापीठात मंझा नोकरीला आहे का याची जाऊन खात्री केली. तेव्हा मंझा यांनी त्याची दालनात भेट घेतली. त्यामुळे विश्वास पटला. चव्हाण यांनी कर्ज व उसनवारी करून जयश्री आंबेवाडीकर यांच्या घरी ऑक्टोबर २०१५ मध्ये मंझा यांना तीन लाख रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...