आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोड्याच्या प्रयत्नात जालना पासिंगच्या बनावट कारचा वापर;‘अाेएलएक्स’वरून नंबरप्लेटची काॅपी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अौरंगाबाद- राजस्थानातील जयपूरच्या अॅक्सिस बँकेच्या चेस शाखेत दराेड्याचा प्रयत्न झाला हाेता. मात्र सुरक्षा रक्षकांनी गाेळीबार करून ताे डाव हाणून पाडला. बँकेबाहेरील सीसीटीव्हीत दराेडेखाेरांच्या इनाेव्हा कारचे रेकाॅर्डिंग झाले हाेते, त्यात ही गाडी जालना पासिंगची (एमएच २१) असल्याचे दिसले हाेते. या क्रमांकाची माहिती घेेऊन जयपूरच्या पाेलिसांनी तपास केला असता या क्रमांकाची गाडी अाैरंगाबादेत असल्याचे समजले. त्यामुळे जयपूरच्या पाेलिसांनी अाैरंगाबादेत येऊन चाैकशी केली. मात्र संबंधित गाडीचे किंवा त्याच्या मालकाचे या गुन्ह्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र विक्रीसाठी या गाडीची माहिती  व फाेटाे संबंधितांनी अाेएलएक्सवर टाकले हाेते. त्याचा अाधार घेत तशीच हुबेहूब नंबरप्लेट  त्याच रंगाच्या दुसऱ्या इनाेव्हाला लावून तपासाची दिशा भरकटवण्याचा दराेडेखाेरांनी प्रयत्न केल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले अाहे.   

 

सहा फेब्रुवारी रोजी जयपूरच्या बँकेवर दराेड्याचा प्रयत्न झाला हाेता. मध्यरात्री दोनच्या सुमारास इनोव्हा आणि मारुती डिझायर कारमधून अालेल्या १३ दराेडेखाेरांनी गेटवरील सुरक्षा रक्षकाला बांधून बँकेत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु अात तैनात सुरक्षा रक्षक सीताराम कानी यांनी तत्काळ गोळीबार केला. त्यामुळे घाबरलेले दराेडेखाेर काठ्या व बंदुका बँकेसमोरच टाकून पळून गेले. पाेलिसांनी नंतर सीसीटीव्ही फुटेजवरून अाराेपींचा शाेध घेण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी ८ जणांना अटक करण्यात अाली असून इतर साथीदार फरार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

ओएलएक्सवर भेटली औरंगाबादची इनोव्हाची माहिती   

नऊ महिन्यांपूर्वी जालन्याच्या एका व्यक्तीने त्यांची इनोव्हा (एमएच २१/ व्ही  ५७३३) विक्रीची जाहिरात ‘ओएलएक्स’वर टाकली होती. ती पाहून दराेडेखाेरांनी गुन्ह्यात याच रंगाची इनाेव्हा वापरली, इतकेच नव्हे तर जालन्याच्या गाडीप्रमाणे हुबेहूब नंबर प्लेट बनवून अापल्या गाडीला लावली. पाेलिसांनी अाराेपींचा शाेध घेतलाच तर त्यांचा तपास महाराष्ट्रापर्यंत भरकटावा, असा यामागे अाराेपींचा उद्देश हाेता. त्यांचा हा प्रयत्नही यशस्वी झाला. बँकेबाहेरील सीसीटीव्हीत कैद झालेल्या दराेडेखाेरांच्या गाडीचा क्रमांक पाहून त्याच्या तपासासाठी जयपूरचे पाेलिस महाराष्ट्रात अाले. चाैकशीत जालन्याच्या वाहनमालकाने ही गाडी सात महिन्यांपूर्वीच अाैरंगाबादच्या अन्जर गौस कादरी यांना विकल्याचे समोर आले. त्यानुसार जयपूर पाेलिसांनी अाैरंगाबादेत येऊन चाैकशी केली असता घटनेच्या दिवशी कासरी यांची कार अाैरंगाबादेत असल्याचे पुराव्यानिशी स्पष्ट झाले. त्यानंतर दराेडेखाेरांनी लढवलेली ‘शक्कल’  जयपूर पाेलिसांच्या लक्षात अाली अाणि ते अाल्या पावली परतले.  

 

मालकाला मनस्ताप    
जयपूर पाेलिसांनी अाैरंगाबादचे पाेलिस अायुक्त यशस्वी यादव यांची भेट घेऊन त्यांना प्रकरण सांंगितले. त्यानुसार कादरी यांना चाैकशीसाठी बाेलावण्यात अाले. कादरींनी गाडीची कागदपत्रे, घटनेच्या दिवशी गाडी कुठे हाेती, याचे पुरावे दिले. गाडीचे मीटर रीडिंगही तपासण्यात अाले. अखेर सखाेल तपासानंतर कादरींची गाडी गुन्ह्यात वापरलीच नसल्याची जयपूर पाेलिसांची खात्री पटली. मात्र, या गाेंधळात दाेन दिवस कादरींना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...