आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : सावरकरांच्या पुतळ्याला डांबर लावण्याचा प्रयत्न, तणावानंतर लगेच रंगरंगोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - देशभरात सुरू असलेल्या पुतळा विटंबनाचे लोण औरंगाबादपर्यंत पोहोचले आहे. शहरातील समर्थनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला रात्री डांबर लावण्याचा प्रकार करण्यात आला. या प्रकाराने परिसरात तणाव पसरला आहे. अग्निशमन दलाला पाचारण करून पुचळ्याजवळ स्वच्छता करण्यात आली. या प्रकारानंतर नागरिकांनी रास्ता रोकोही केला. 

 

नागरिकांचा रास्ता रोको 
दरम्यान, या प्रकारानंतर भाजप, शिवसेना आणि ब्राह्मण समन्वय समिती यांच्यावतीने समर्थनगर येथे रास्ता रोको करण्यात आला. आमदार अतुल सावे, प्रदीप जैस्वाल, राजू वैद्य, ऋषिकेश खैरे, सचिन खैरे तसेच भाऊ सुरडकर, आशिष सुरडकर, लक्ष्मीकांत थेटे हेही घटनास्थळी दाखल झाले. हा प्रकार करणाऱ्या समाजकंटकांना तत्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

 

..तर जबाबदारी तुमची

तीन दिवसांच्या आत आरोपीला अटक करा अन्यथा शहरातील कायदा सुव्यवस्था बिघजल्यास पोलिसांची जबाबदारी असेल असा इशारा यावेळी देण्यात आला. 


सध्या याठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोर्धन कोळेकर, पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, अनिल आडे यांच्यासह मोठा फौज फाटा याठिकाणी आहे. 

 

शहरातील डीसीपी ऑफिस समोरच हा प्रकार करण्यात आला. तीन महिन्यात तिसऱ्यांदा शहर अशांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

 

पुढे पाहा, संबंधित PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...