आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात 58 टक्के पाणीसाठा; लघु प्रकल्पात अवघा 47 टक्के

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यात सर्व धरणांत डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ५८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. लघु प्रकल्पात अवघा ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पात पाणीसाठा वेगाने कमी होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

 
मराठवाड्यात या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला होता. मात्र लघु प्रकल्पात कमी पाणीसाठा झाल्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मध्यम प्रकल्पात केवळ १४ टक्के पाणी उरले आहे. मध्यम प्रकल्पाची क्षमता २०५ दलघमी असताना केवळ २८ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. हे प्रमाण १४ टक्के आहे. सुखना धरणात ४० टक्के, अजिंठा-अंधारी ११, अंबाडी २५, गडदगड ९२, ढेकू ३५, कोल्ही ३५ टक्के पाणीसाठा आहे. लहुकी, गिरिजा, वाकोद, खेळणा, अंजना पळशी, टेंभापुरी प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. ९० लघु प्रकल्पांत १८४ दलघमी प्रकल्पीय क्षमता असताना केवळ ४८ दलघमी पाणीसाठा आहे. 

बातम्या आणखी आहेत...