आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंड्यातील पैशासाठी पत्नीचा खून; फरार नवरोबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- हुंड्यातील राहिलेल्या ३० हजार रुपयांसाठी पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीला वाळूज पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बेड्या ठोकण्यात यश मिळवले. तुर्काबाद खराडी येथे गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास खुनाची घटना घडली होती. 


पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सांगितले की, तुर्काबाद खराडी येथील भावलाल सोनवणे यांच्या लता नावाच्या मुलीचा विवाह महिन्यांपूर्वी लासूरगाव येथील अनिल कडुबाळ माळी (२५) याच्याशी झाला होता. मात्र, ठरल्याप्रमाणे लग्नात हुंड्याची ३० हजार रुपयांची रक्कम अनिलला दिलेली नव्हती. काही दिवसांनंतर नवदांपत्य कामानिमित्त तुर्काबाद खराडी गावात आले होते. अनिलला लिंबेजळगाव येथील वीटभट्टीवर काम मिळाले होते. यादरम्यान लग्नात अनिलला कबूल केलेल्या हुंड्यातील ३० हजार रुपयांसाठी त्याने पत्नी लताकडे तगादा लावला होता. त्यावरून तो लताला मारहाण करायचा. 

 

या कारणामुळे त्यांच्यात वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी डिसेंबर रोजी सकाळी उठल्यापासून त्यांच्यात कुरबूर सुरू होती. हा वाद वाढत जाऊन शेवटी अनिलने तिचा गळफास देऊन खून केला आणि तो पसार झाला होता. याप्रकरणी मृत लताचा भाऊ जनार्दन सोनवणे यांच्या तक्रारीवरून वाळूज पोलिस ठाण्यात पती अनिल माळीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिस पथकाने त्याला शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास अटक केली. पोलिस उपनिरीक्षक शशिकांत तायडे तपास करीत अाहेत.

बातम्या आणखी आहेत...