आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवरून मैत्री करून महिलेने घातला वकिलाला चाळीस हजार रुपयांचा गंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- फेसबुकवरून मैत्री करून एका महिलेने वकिलाला चाळीस हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी प्रदीप नरसिंह शिंदे (३२, रा. बाळापूर शिवार) यांच्या तक्रारीवरून महिलेवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप यांची फेसबुकच्या माध्यमातून एका महिलेसोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचे फेसबुकवर बोलणे सुरू झाले. 


कालांतराने व्हॉट्स क्रमांकाची देवाणघेवाण झाली. महिलेने 'मी तुम्हाला विदेशातून एक महागडी भेटवस्तू पाठवत आहे. त्यासाठी काही कस्टम चार्जेस लागतील,' असे सांगितले. मैत्रीमुळे प्रदीप यांनी विश्वास ठेवला आणि महिलेने दिलेल्या बँक खात्यावर ४० हजार रुपये जमा केले. परंतु नंतर महिलेशी संपर्क बंद झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

बातम्या आणखी आहेत...