आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पाेलिस ललिता साळवेंना लिंगबदलास परवानगी; राज्यात प्रथमच शासकीय कर्मचाऱ्यास अशी मुभा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शरीरात स्त्रीपेक्षा पुरुष गुणसूत्रांचे प्रमाण अधिक असल्याने त्रस्त असलेल्या बीड जिल्ह्यातील महिला पोलिस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांना अखेरीस राज्य सरकारने लिंगबदलास परवानगी दिली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून साळवेंचा विनंती अर्ज लालफितीत अडकला हाेता. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. अखेरीस २० मे रोजी साळवे यांना शासनाचे लेखी परवानगीचे पत्र प्राप्त झाले असून लवकरच मुंबईतील शासकीय रुग्णालयात त्यांची लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 


साळवे यांच्या शरीरात गेल्या चार - पाच वर्षांपासून वेगळेच बदल होऊ लागले होते. त्याबाबत त्यांनी केलेल्या वैद्यकीय चाचणीत त्यांच्या शरीरात स्त्री गुणसूत्रांपेक्षा पुरुषांच्या गुणसूत्रांचे प्रमाण अधिक असल्याचे व तद्नुषंगाने स्त्री अवयवांपेक्षा अर्धवट अवस्थेतील पुरुष अवयव असल्याचे पुढे आले. दिवसागणिक यातून उद‌्भवणारा शारीरिक, मानसिक व भावनिक त्रास वाढत गेल्याने अखेरीस त्यांनी लिंगबदलाचा निर्णय घेतला. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना नोकरी गमावून किंवा शासनापासून गोपनीयता बाळगून सदर लिंगबदल प्रक्रिया करायची नसल्याने त्यांनी १९ सप्टेंबर रोजी पोलिस महासंचालकांकडे सदर परवानगीसाठीचा अर्ज केला. परंतु साळवे यांची भरती स्त्री गटातून झाल्याने त्यांचा अर्ज नोव्हेंबरमध्ये फेटाळण्यात आला. त्यानंतरही त्यांनी शासन दरबारी याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला. लिंगबदलासाठी आपली ओळख खुली करणाऱ्या तसेच शासकीय सेवेतच राहून यासाठीची परवानगी मागणाऱ्या साळवे या पहिल्याच व्यक्ती असल्याने त्यांच्याबाबतचा निर्णय गुंतागुंतीचा होता. साळवे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली होती. त्यानंतर गृह खात्यातील त्यांच्या अर्जावर कार्यवाही सुरू झाली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...