आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात १०६% पाऊस; धरणांत केवळ १२ % साठा; मुंबईत आणखी पावसाचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलग दोन दिवस संततधार पडणाऱ्या पावसाने  रविवारीही मुंबईला झोडपून काढले. दुपारी अडीचपर्यंत कुलाबा येथे ११२ मिमी तर सांताक्रुझ ३७.२ मिमी पावसाची नोंद झाली. - Divya Marathi
सलग दोन दिवस संततधार पडणाऱ्या पावसाने रविवारीही मुंबईला झोडपून काढले. दुपारी अडीचपर्यंत कुलाबा येथे ११२ मिमी तर सांताक्रुझ ३७.२ मिमी पावसाची नोंद झाली.

औरंगाबाद- यंदाच्या पावसाळ्यात मराठवाड्यात आतापर्यंत २१० मिमी म्हणजेच अपेक्षित सरासरीच्या १०६% पाऊस झाला असला तरी या विभागांतील माेठ्या धरणांच्या पातळीत मात्र अजूनही अपेक्षित वाढ झाली नाही. सध्या मराठवाड्यातील माेठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी फक्त १२ टक्केच पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी, सिद्धेश्वर, सिना कोळेगाव ही धरणे शून्य टक्क्यावरच अाहेत. या सर्व धरणांत फक्त ६०१ दलघमी पाणी आहे. विदर्भातही अशीच स्थिती आहे. शुक्रवारी नागपुरात ६ तासांत २६३ मिमी पाऊस पडला तरी या विभागातील माेठ्या धरणांमध्ये रविवारपर्यंत फक्त १८.६७ टक्के तर अमरावती विभागातील धरणांत १६.८८ टक्केच जलसाठा अाहे. म्हणजे विदर्भातील सरासरी जलसाठा १७.७७ टक्केच अाहे. 


जायकवाडी धरणात अद्याप २० टक्केच पाणीसाठा 
- मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यात उपयुक्त साठा ४३३ दलघमी आहे. माजलगाव धरणात २%, मांजरा धरणात ०६ %, ऊर्ध्व पैनगंगा ४, निम्म तेरणा ४३, मानार ०९, विष्णुपुरी ३५ तर दुधना प्रकल्पात १५% साठा आहे. 
- ७५ मध्यम प्रकल्पांत १३० दलघमी (१३.९४%), ७४६ लघु प्रकल्पांत केवळ १५३ दलघमी (९%) साठा. 


औरंगाबाद जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्प कोरडे
जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत २०५ दलघमी क्षमता असताना केवळ ३ दलघमी इतका पाणीसाठा आहे. हे प्रमाण केवळ २% आहे. १६ पैकी १३ प्रकल्प कोरडे आहेत. 


मुंबईत मुसळधार, आणखी पावसाचा इशारा 
सलग दोन दिवस संततधार पडणाऱ्या पावसाने रविवारीही मुंबईला झोडपून काढले. दुपारी अडीचपर्यंत कुलाबा येथे ११२ मिमी तर सांताक्रुझ ३७.२ मिमी पावसाची नोंद झाली. येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघर अाणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली अाहे. 


मराठवाड्यातील प्रकल्पांची स्थिती 
- ५१४३ दलघमी मोठ्या प्रकल्पांची क्षमता 
- ६०१ दलघमी सध्याचा पाणीसाठा 
- २०१३ मध्ये ७ जुलैअखेर ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ८३४ दलघमी, २०१४मध्ये २९८२ दलघमी, २०१५ मध्ये १९८५ आणि २०१६ मध्ये ४६ दलघमी इतका पाणीसाठा होता. 

बातम्या आणखी आहेत...