आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१०८७ जणांनी केली ऑनलाइन नोंदणी; ६०० विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह श्रमदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - पाणी फाउंडेशनअंतर्गत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे महाराष्ट्रदिनी एक मे रोजी सकाळी ९ ते ११ या कालावधीत महाश्रमदानाचे आयोजन केले आहे. या महाश्रमदानात सहभागी होण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह महाराष्ट्रातील विविध शहरांतून १०८७ नागरिकांनी जलमित्र 
म्हणून ऑनलाइन नोंदणी केली आहे. तसेच विविध संघटनांच्या ६०० नागरिकांसह एक हजार निधोनावासी या महाश्रमदानात सहभागी होणार आहेत.


पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक बिभीषण बोईते यांनी ग्रामस्थांसमवेत चर्चा महाश्रमदानाची रूपरेखा ठरवली. नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना केली. महाश्रमदानासाठी सहभागी होणारे नागरिक १५ हजार रनमीटर बांध बांधणार आहेत. त्यासाठी लागणारे  २०० टिकाव, ३०० फावडे, ७०० टोपले हे साहित्य पाणी फाउंडेशन पुरवणार आहे. तसेच निधोन्याचे गावकरी आपल्याकडील ३०० फावडे, टिकाव व टोपले घेऊन श्रमदानात सहभागी होणार आहेत. जवळपास २८०० नागरिक महाश्रमदान करतील अशी अपेक्षा आहे. श्रमदानासाठी जवळपास १५ हजार मीटर सीसीटीची आखणी केली असून दगडी बांध बांधण्यात येणार आहेत. श्रमदानानंतर ११ वाजता गावकऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केली आहे. तसेच जे नागरिक एक दिवस आधी  सोमवारी निधोन्यात पोहोचतील त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था जिल्हा परिषद शाळेत केली आहे.  

 

महाश्रमदानात सहभागी व्हा  
महाराष्ट्रदिनी एक मे रोजी निधोना येथे होणाऱ्या महाश्रमदानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन निधोन्यासह फुलंब्री तालुक्याला दुष्काळापासून कोसोदूर करण्यासाठी  सहभागी हाेण्याचे आवाहन पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक बिभीषण बोईते यांनी केले.  

 

५ रुग्णवाहिकांसह आरोग्य सुविधा  
श्रमदानादरम्यान काही दुखापत झाल्यास त्यासाठी एमजीएम हॉस्पिटलच्या तीन रुग्णवाहिका व फुलंब्री ग्रामीण रुग्णालयाच्या दोन अशा ५ रुग्णवाहिकांसह प्राथमिक उपचारासाठी डॉक्टरांची टीम असणार आहे.  

 

 

दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी श्रमदान  
महाश्रमदानासाठी मी नोंदणी केली. मी निधोन्यात श्रमदानात सहभागी होणार आहे. मी सिल्लोड तालुक्यातील रहिवासी असून माझे वय ५८ वर्ष आहे.
-अनंत वाघ, औरंगाबाद.

 

श्रमदानात सहभागी होणार  
पाणीटंचाईतून सावरण्यासाठी  पाणी फाऊंडेशनद्वारे चांगले काम सुरू आहे. निधोना येथे महाराष्ट्रदिनी होणाऱ्या महाश्रमदानात माझ्यासह माझे दोन मित्र सहभागी होणार आहेत. 
-रोहित सावंत, इंजिनिअर, मुंबई.  

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...