आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या वर्षीच्या तुलनेत जायकवाडीमध्ये ११% जास्त पाणी, ७ प्रकल्प तळाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- पावसाळा सुरू होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी लोटला. तथापि अद्यापही मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पात  पुरेसा पाणी साठा जमा झालेला नाही. गत वर्षीच्या तुलनेत १० जुलै रोजी जायकवाडीत २८.४३ टक्के पाणी असले तरी मराठवाड्यातील इतर प्रकल्पांत अल्प पाणी साठा आहे. सध्याचे चित्र पाहता दुष्काळाचे सावट अद्यापही पूर्णत: दूर झालेले नाही.    


मराठवाड्यात नांदेड हा सर्वाधिक पर्जन्यमानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचे एकूण वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९५५.५५ मि.मी. आहे. सर्वाधिक पर्जन्यमानाचा म्हणून ओळखला जाणाऱ्या या जिल्ह्यातही मंगळवारपर्यंत सरासरीच्या केवळ ३५.२४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. इतर जिल्ह्यांतही याहून वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर महिना लोटला तरी सिंचन प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा जमा झालेला नाही. गेल्या वर्षीही मराठवाड्यात पुरेसे पर्जन्यमान झाले नाही. तथापि जायकवाडीच्या वरच्या काही भागांत पाऊस झाल्याने धरणात मुबलक पाणी साठा जमा झाला.


पाणीपुरवठा सुरळीत नाही   
पुरेसा पाऊस झाला नसल्याने अजूनही महापालिकेतर्फे करण्यात येणारा पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. नांदेड शहरात अद्यापही तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ सुरूच आहे. विष्णुपुरीत सध्या बऱ्यापैकी पाणीसाठा असूनही सावधगिरीची उपाययोजना म्हणून रोज पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही.    

बातम्या आणखी आहेत...