आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीए परीक्षेत औरंगाबादचे १२ विद्यार्थी उत्तीर्ण, तिघे देशातील पहिल्या पन्नासमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मे २०१८ मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट्सच्या (सीए) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून शहरातील बारा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी सुमीत पेंडसे (३२ वा), अश्वीन कासलीवाल (३४वा) आणि अद्वैत कुलकर्णी (४३ वा) या तिघांनी देशपातळीवर पहिल्या पन्नासमध्ये स्थान मिळवले आहे. या परीक्षेला शहरातून ३३० विद्यार्थी बसले होते. निकालाचे हे प्रमाण अवघे सहा टक्के आहे. 


औरंगाबाद सीए शाखेचे अध्यक्ष सचिन लाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातून बारा विद्यार्थी सीएची परीक्षा पास झाले. यात प्रियांका बोरा, संतोष घाळ, प्रतीक धूत, निकिता बडजाते, ईशानी जाजू, ऋषभ गोधा, तेजल धूत, सुशील खिंवसरा, सचिन सोनी यांचा समावेश आहे. औरंगाबाद सीए संघटनेच्या वतीने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...