आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूरसाठी औरंगाबाद जिल्‍ह्यातून 120 अतिरिक्‍त बस, विशेष रेल्वेच्या 12 फेऱ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने औरंगाबाद जिल्ह्यातून १२० जादा बस साेडल्या आहेत. तर रेल्वे प्रशासनाने आदिलाबाद-पंढरपूर, अकोला-पंढरपूर, बीदर-पंढरपूर, पंढरपूर-बीदर आणि नगरसोल-पंढरपूर मार्गावर विशेष रेल्वे सोडल्या असून १२ फेऱ्यांद्वारे प्रवाशांची व्यवस्था केली आहे.

 

नगरसोल-पंढरपूर विशेष रेल्वे नगरसोल येथून सायंकाळी साडेपाच वाजता सुटेल. रोटेगाव, परसोडा, लासूर मार्गे औरंगाबादला सायंकाळी ६.५० वाजता येईल आणि ७.०५ वाजता सुटेल. जालना रात्री ८.२० वाजता, परतूर, सेलू, मानवत रोड मार्गे परभणी येथून रात्री १२.५० वाजता सुटेल. गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी मार्गे पंढरपूरला सकाळी १०.०५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात पंढरपूर-नगरसोल विशेष गाडी २४ जुलै रोजी रात्री ११.५० वाजता सुटेल. औरंगाबाद स्थानकावर २५ जुलै रोजी सकाळी ११.४०, तर नगरसोलला दुपारी १३.३० वाजता पोहोचेल. या गाडीस १० डबे आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...