आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात 1,650 कोटी गुंतवणूक, तीन हजार रोजगार;जालना,शेंद्रा-वाळूजमध्ये मोठी गुंतवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्य सरकार देशी-विदेशी कंपन्यांची अब्जावधींची गुंतवणूक खेचण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक कंपन्यांनीही गुंतवणुकीत पुढाकार घेतला आहे. मराठवाड्यात १२८ कंपन्यांनी सामंजस्य करार केले. ६ स्थानिक कंपन्या मराठवाड्यात तब्बल १,६५० काेटींची गुंतवणूक करत आहेत. त्यांना एमआयडीसीने जागांचा ताबाही दिला आहे. लातुरात केंद्राचा रेल्वे बोगीचा कारखाना येत असून त्यांना सेझमधील ३९ हेक्टर जागा देण्याचा प्रस्ताव आहे. देशाचे स्टील हब म्हणून अोळखल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यात तीन स्टील कंपन्या सुरू होत आहेत. सध्याच्या घडीला येथे १८ स्टील कंपन्या आहेत.

 

१२८ कंपन्यांशी करार..
या सर्व कंपन्या स्थानिक असून त्यांचे विस्तारीकरण होत आहे. त्यांना जालना, वाळूज, पैठण एमआयडीसीत एकूण २ लाख ४६ हजार चाैरस मीटर जागा देण्यात आली आहे. यातून एकूण ३ हजार लोकांना रोजगार अपेक्षित आहे. १२८ कंपन्यांशी नुकताच जागेसंदर्भात करार झाला आहे. यात ऑरिक सिटीतील ३० कंपन्या आहेत.
- सोहम वायाळ, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, अशी होणार गुंतवणूक... 

 

बातम्या आणखी आहेत...