आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरामध्ये महिनाभरात सापडली १९ गावठी पिस्तुले, अाणखी एका संशयितास अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरात विविध ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत महिनाभरात १९ गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली अाहेत. विशेेष म्हणजे, सराईत गुन्हेगारांकडे प्राणघातक शस्त्रे अाढळल्याने गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाल्याचे निदर्शनास येत आहे. शुक्रवारी (दि. ४) गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने गावठी पिस्तूल विक्री करण्यास आलेल्या सराईतास अटक केली. 


या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट १ चे पथक शहरात गस्त घालत असताना एक संशयित गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने अमृतधाम चौफुलीवर सापळा रचला. एक तरुण तेथे संशयितरित्या फिरताना अाढळून आला. पथकाने त्यास ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे मिळाली. चौकशीत त्याने आकाश गणेश पवार (रा. सिन्नर) असे नाव सांगितले. वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ, दीपक गिरमे, रवींद्र बागुल, वसंत पांडव, दिलीप मेंढे, विशाल देवरे, शांताराम महाले, स्वप्नील जुंद्रे, राहुल पालखेडे, दीपक जाठर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 


रॅकेटचे मूळ शोधणार 
गावठी कट्टे परराज्यातून येत आहेत. शहरातील गुन्हेगारांना कट्टे विक्री करणारे रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे. विक्री करणाऱ्या संशयितांकडून काही नावे समजली आहेत. शस्त्र खरेदी करण्याचे मूळ शोधले जाणार आहे. 
- अशोक नखाते, सहा. आयुक्त 


गावठी पिस्तूल विक्री करणारे रॅकेट 
शहरात गावठी पिस्तूल विक्री करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शहर व परिसरात विविध कारवायांमध्ये पोलिस ठाणे, गुन्हे शाखा युनिट १ व २ च्या पथकाने १९ पिस्तुले आणि ४० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये सराईत गुन्हेगारांसह राजकीय नेत्याच्या मुलाचाही समावेश असल्याने गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाल्याचे या घटनांतून निदर्शनास येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...