आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना-भोकरदन रस्‍त्‍यावर ट्रक-इंडिका कारचा भीषण अपघात, 2 जण जागीच ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन- जालना-भोकरदन रस्त्यावर आज सकाळी साडेसहा वाजता ट्रक व इंडिका कार यांमध्‍ये भीषण अपघात झाला आहे. यामध्‍ये इंडिकाकारमधील 2 जण जागीच ठार  झाले असून एक जखमी झाला आहे. शैलेंद्र देविदास गुजर आणि समाधान दरबार पारधी असे मृत व्‍यक्‍तींचे नाव आहे. तर विलास ताराचंद कोल्हे हे जखमी झाले आहेत. दोघेही मृत हे जळगाव जिल्‍ह्यातील जामनेर तालुक्‍याचे रहिवासी असल्‍याची माहिती आहे. मृत शैलेंद्र देविदास गुजर हे इंडिका कार चालवत होते.

 

आज सकाळी जालना-भोकरदन रस्त्यावरील बानेगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, यामध्‍ये इंडिका कारचा अक्षरश: चुराडा झाला. घटनेची माहिती होताच येथील ग्रामस्‍थांनी ताबडतोब घटनास्‍थळी धाव घेत जखमींना मदत केली. या दुर्घटनेत बचावलेले विलास ताराचंद कोल्‍हे यांना उपचारासाठी अॅम्‍बुलन्‍सद्वारे जालना येथील रुग्‍णालयात पाठवण्‍यात आले आहे.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, या भीषण अपघाताचे फोटो...

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...