आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भद्रा मारुतीच्‍या दर्शनाहून परतणाऱ्या मित्रांचा पेट्राेल टँकरच्या धडकेत मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन शहराकडे येणाऱ्या दोन मित्रांचा पेट्रोल टँकरच्या धडकेत करुण अंत झाला. शरणापूर फाट्याजवळील पाशाभाई ढाब्यासमोर शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता झालेल्या भीषण अपघातात प्रशांत ऊर्फ बंटी सुभाष शिंदे (१७, रा. विजयनगर) व त्याचा मित्र ॠषिकेश अशोक पैठणकर (१६, रा. गुरुदत्तनगर) हे ठार झाले.

 

दोघांनी या वर्षी दहावीची परीक्षा दिली होती. प्रशांतचे वडील सुभाष शिंदे हे बांधकाम ठेकेदार आहेत. ते शनिवारी दुपारी कामाच्या ठिकाणी असताना प्रशांतने त्यांची दुचाकी (एमएच २० ईपी ०७४९) घेतली. घरातून काही पैसे घेऊन ऋषिकेशला सोबत घेऊन तो दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास खुलताबादकडे निघाला. तेथे भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन दोघे शहराकडे निघाले. सायंकाळी साडेसात वाजता शरणापूर फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या टँकरने (एमएच १० झेड १९२९) जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. घाटी रुग्णालयात नेत असताना ऋषिकेशचा तर यशवंतचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशांतला दोन भाऊ व एक लहान बहीण आहे. ऋषिकेशच्या पश्चात आई व दोन बहिणी आहेत.

बातम्या आणखी आहेत...