आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील 20 गावांमध्ये 23 मशीन कार्यान्वीत; ग्रामस्थांच्या श्रमदानाला बळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- जिल्हा दुष्काळ मुक्तीच्या लढ्यात भारतीय जैन संघटना तन-मन-धनाने उतरली असून, सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा २०१८मध्ये श्रमदान करणाऱ्या हजार गावांना मशीन उपलब्ध करुन देण्यास प्रारंभ झाला अाहे. अातापर्यंत मशीनसाठी पात्र २० गावांमध्ये २३ मशीन उपलब्ध करुन दिल्या असून, साेमवारी अाणखी १४ मशीन विविध गावांत दाखल हाेणार अाहेत. सामाजिक कर्तव्य भावनेतून भारतीय जैन संघटनेने दुष्काळ मुक्तीच्या चळवळीला समर्थ साथ दिली अाहे. या लढ्याच्या व्यापक िनयाेजनासाठी यासाठी २४ एप्रिल जिल्हाधिकारी संघटनेतर्फे बैठकही अायाेजित करण्यात अाली हाेती. या बैठकीत जिल्हा प्रशासनासाेबत संघटनेने दुष्काळ मुक्तीच्या मुद्द्यावर मंथन करुन नियोजन केले हाेते. त्यानुसार अाता अंमलबजावणीला वेगही अाला अाहे. सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा २०१८मध्ये श्रमदानाचे निकष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक सहभागी गावाला भारतीय जैन संघटनेकडून जेसीबी किंवा पोकलेन उपलब्ध करून देण्यात येत अाहे. याव्दारे २०० तासाची असलेली मर्यादा आवश्यकता वाटल्यास ४०० ते ६०० तासापर्यंत करण्यात येणार आहे, अशी घोषणा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली हाेती. यासाठी गावांकडून जैन संघटनेकडे नोंदणी करण्यात येत अाहे. नजीकच्या ठिकाणी पोकलेन किंवा जेसीबी उपलब्ध असल्यास आपल्या स्तरावरूनच त्यांच्याशी बोलणी करून करार करावा लागणार असून नियमाप्रमाणे जेसीबीचे भाडे भारतीय जैन संघटना देणार अाहे. किमान १५ गुण मिळवणाऱ्या गावांना भारतीय जैन संघटना विनामूल्य पाेकलॅन व जेसीबी मशीन उपलब्ध करुन देत अाहे. 

 
तालुक्यातील श्रमदानाचे चित्र 
बार्शीटाकळी : तालुक्यातील २६ गावं मशीनसाठी पात्र ठरली. त्यापैकी ४ गावांमध्ये ५ मशिनने कामाला सुरुवातही झाली अाहे. 
पातूर:- मशिनसाठी पात्र ठरलेल्या तालुक्यातील १६ पैकी ५ गावांमध्ये ७ मशीन कार्यांिन्वत झाल्या अाहेत. 
अकाेट:- तालुक्यातील २१ गावं मशीनसाठी पात्र ठरली असून, ५ गावांमध्ये मशिनने कामांनाही प्रारंभ झाला अाहे. 
तेल्हारा:- तालुक्यातील १२ गावांची मशिनसाठी निवड करण्यात अाली अाहे. ६ गावांमध्ये मशीनच्या माध्यमातून कामांनी वेग घेतला अाहे. 


अाेघ सुरुच
जिल्ह्यात मशीनची कमतरता असल्याने भारतीय जैन संघटनेने बाहेर गावावरून नवीन मशीनची मागणी केली अाहे. जिल्ह्यात सोमवारपासून अाणखी १४ मशीन कार्यांिन्वित हाेणार अाहे. 


असे सुरु आहे नियोजनबद्ध कार्य 
सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा -२०१८ अर्थात जिल्हा दुष्काळ मुक्तीच्या लढ्याचे नियाेजनबद्ध कार्य भारतीय जैन संघटनेकडून करण्यात येत अाहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु अाहे. यासाठी जिल्हा समन्वयकाची जबाबदारी प्रा. सुभाष गादीया यांच्यावर सोपवली. चार तालुक्यांसाठी प्रमुखांचीही नेमणूक केली असून, यात शैलेंद्र पारख (बार्शीटाकळी), किशाेर बाेथरा (पातूर), भारत वासे (अकाेट), भरतभाई दाेसी (तेल्हारा) यांचा समावेश अाहे. तसेच तालुका समन्वकांची (कर्मचारी) निवड करण्यात अाली अाहे. यात अादीनाथ पवार (अकाेट), संदीप म्हस्के (पातूर), संताेष पवार (बार्शिटाकळी) आणि शहादेव सुर्वे (तेल्हारा) यांचा समावेश अाहे. 

बातम्या आणखी आहेत...