आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदमपुरा, सिल्कमिल कॉलनीतून दोन दिवसांत ३६ तोेळे सोने चोरले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पदमपुरा आणि सिल्कमिल कॉलनीत चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन दिवसात ३६ तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाखांची रोकड चोरली. यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. 


पदमपुरा भागातील रमण रामानुज रांदड (३९, रा. वेणुगोपाल हाइट्स, नवयुग कॉलनी) यांचे सिडको एन-३ भागात कपड्याचे दुकान आहे. ३० जून रोजी सकाळी दहाच्या सुमारास रांदड दुकानात तर त्यांच्या पत्नी पूनम घराला कुलूप लावून बँकेत गेल्या होत्या. चोराने त्यांच्या दरवाजाचे लाॅक तोडून बेडरूमच्या कपाटातील अडीच तोळ्याचे मणी मंगळसूत्र, एक तोळ्याचे ब्रासलेट, चार तोळ्याचे प्रत्येकी पाच ग्रॅमचे कानातले आठ नग, एक ग्रॅमची नथ, तीन तोळ्याच्या चार नग पाटल्या तसेच २० हजार रोख लंपास केले. हा प्रकार दुपारी पावणे दोनच्या सुमारास घरी परतलेल्या पूनम यांच्या लक्षात आला. वेदांतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. 


दुसऱ्या घटनेत १ जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास शासकीय ठेकेदार प्रशांत बाबासाहेब कोळसे (३२, रा.अमृत साई प्लाझा, सिल्क मिल कॉलनी) यांच्या घरात चोरी झाली. २९ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ते पत्नीसह फ्लॅटच्या लोखंडी आणि लाकडी दरवाजाला कुलूप लावून नगर जिल्ह्यातील भेंडाळा येथे आई-वडिलांना भेटण्यासाठी गेले होते. तेथून रविवारी दुपारी घरी परतले. तेव्हा दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. कपाटातील कपडे व इतर साहित्य बेडवर अस्ताव्यस्त पडले होते.


कपाटातील चार तोळ्याचा राणीहार, प्रत्येकी तीन तोळ्याचे दोन साखळी गंठण, प्रत्येकी पाच ग्रॅमचे झुंबर, पाच अंगठ्या, तीन तोळ्यांचे लॉकेट, दोन ग्रॅमची नथ, एक तोळ्याचे नेकलेस, एक तोळ्याची अंगठी, पाच ग्रॅमची मुलाची चेन, वाळ्या, झुंबराचे जोड, वेल, चार ग्रॅमची पोत तसेच एक लाख २० हजार रोख असा ऐवज चोरी झाल्याचे दिसले. विशेष म्हणजे कपाटाच्या ड्रॉवरमधून सोन्याचे दागिने आणि रोकड लांबवताना चोराने चांदीचे दागिने आणि कॅमेऱ्याला हातही लावला नाही. 


टेंडर भरण्यासाठी आणली होती रक्कम 
कोळसे यांनी मित्राला काही दिवसांपूर्वी मोठी रक्कम उसनी दिली होती. मित्राने त्यांना गेल्या आठवड्यात रक्कम परत केली. चोरीला गेलेली सव्वा लाखांची रक्कम म्हाडाचे टेंडर भरण्यासाठी त्यांनी घरात ठेवली होती. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक अमोल देशमुख, नंदकुमार भंडारे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. मात्र, श्वान घराच्या आसपास घुटमळले. 

बातम्या आणखी आहेत...