आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलंब्रीसह 5 पालिका भाजपकडे, काँग्रेसला एक; शिवसेनेने ठाणे जिल्हा परिषद भाजप समर्थकांकडून खेचली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद/ मुंबई- बुधवारी मतदान झालेल्या राज्यातील दहा नगर परिषदा व नगरपंचायतींपैकी सात ठिकाणचे निकाल गुरुवारी जाहीर करण्यात अाले. या सातपैकी पाच पालिकांत भाजपला यश मिळाले, तर उर्वरित दाेन ठिकाणी अनुक्रमे काँग्रेस व अामदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. तसेच मुंबई महापालिकेच्या एका प्रभागातील पाेटनिवडणुकीत भाजपला अापली जागा कायम राखण्यात यश आले आहे. दुसरीकडे, ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजप समर्थकांच्या ताब्यातून ही जिल्हा परिषद शिवसेनेने हिसकावून घेतली. विधानसभा अध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा मतदारसंघ असलेल्या फुलंब्री (जि. अाैरंगाबाद) नगरपंचायतीची सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली हाेती. मात्र, तरीही येथे भाजपनेच सत्ता प्राप्त करण्यात यश  नगराध्यक्षपदी भाजपचे सुहास शिरसाठ (५३१६ मते) हे विजयी झाले. त्यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे संयुक्त उमेदवार व अाैरंगाबादचे माजी जि. प. अध्यक्ष राजेंद्र ठाेंबरे (५१२६) यांचा पराभव केला.  या नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक हाेती. एकूण १७ जागांपैकी भाजपला ११, अाघाडीला ५, तर एमअायएमला एक जागा मिळाली.  


> किनवट ( नांदेड ): नगराध्यक्षपद निवडणुकीत भाजपचे आनंद मच्छेवार (६३५८ मते) विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार शेख चाँदसाब  (४५४७ मते) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या ताब्यातून ही पालिका भाजपने खेचून अाणली. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रवीण राठाेड (२७४८ मते) व बंडखाेर हबीबोद्दीन चव्हाण (२९८१ मते) यांच्यातील मतविभाजनाचा भाजपला फायदा झाला. शिवसेनेचे सुनील पाटील यांना केवळ १३०२ मते पडली. एकूण १७ जागांपैकी भाजपला ९, राष्ट्रवादीला पाच, तर काँग्रेसला दाेन जागा मिळाल्या.  एका जागी अपक्षाला यश मिळाले. किनवट नगरपालिकेत गेल्यावेळी एकही जागा नसलेल्या भाजपने यंदा मात्र थेट सत्ता हस्तगत केली आहे.


> शिंदखेडा (जि. धुळे) :  नगराध्यक्षपदी भाजपच्या रजनी वानखेडे ३३३३ मतांनी विजयी झाल्या.  त्यांनी काँग्रेसच्या मालती देशमुख यांचा पराभव केला. या नगरपंचायतीत १७ जागांपैकी भाजपला  ९, काँग्रेसला ६, तर समाजवादी पार्टीला २ जागा  मिळाल्या.  शहाद्यातील पाेटनिवडणुकीत एमअायएमचे वसीम सलीम तेली विजयी झाले.  


> हुपरी (जि. काेल्हापूर) : नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या जयश्री गाट १६०० मतांनी विजयी झाल्या. तसेच एकूण १८ जागांपैकी भाजपचे ७, ताराराणी विकास आघाडीचे ५, मनसेप्रणीत अंबाबाई विकास आघाडीचे २, शिवसेनेचे २, तर अपक्ष शिवप्रतिष्ठान संघटनेचे २ नगरसेवक निवडून अाले.  


> सालेकसा (जि. गाेंदिया) : नगराध्यक्षपदी भाजपचे बंडखाेर वीरेंद्र उईके विजयी झाले. एकूण १७ जागांपैकी भाजपला पाच, काँग्रेसला चार, शिवसेनेला दाेन, तर उइके यांच्या अाघाडीला ६ जागी यश मिळाले.  उइके हे भाजपचेच असल्यामुळे ही पालिका अामच्याच ताब्यात अाली असल्याचा दावा भाजपकडून केला जात अाहे.


> चिखलदरा (जि. अमरावती) : नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या विजया राजेंद्र सोमवंशी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या दुर्गा उर्फ पूजा चाैबे यांचा पराभव केला. एकूण १७ पैकी १२ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला, तर भाजपला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले.   


> पांढरकवडा (जि.यवतमाळ) : आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार युवा शक्ती संघटनेने भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेला जोरदार धक्का दिला.  एकूण १९ पैकी १४ जागांवर ‘प्रहार’चे उमेदवार विजयी झाले. तर भाजपला तीन,  काँग्रेस, शिवसेनेला प्रत्येकी एकच जागा मिळाली. नगराध्यक्षपदी ‘प्रहार’च्या वैशाली नहाते १२७० मतांनी विजयी झाल्या.  

 

मुंबईत भाजपच
मुंबई महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग २१ मधील पाेटनिवडणुकीत गिरकर यांच्या सून प्रतिभा (९५९१ मते) विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार नीलम मधाले- मकवाणा (१९८४ मते) यांचा पराभव केला. या प्रभागात गिरकर यांच्या समर्थनार्थ काँग्रेस वगळता अन्य पक्षांनी उमेदवार उभा केला नव्हता. या विजयामुळे मुंबईत भाजपच्या नगरसेवकांची संख्या आता ८३ झाली आहे.

 

नगरपंचायत अध्यक्षही जनतेतून, विधेयक मंजूर

 नगरपंचायत अध्यक्षाचीही निवड थेट जनतेतून करण्याची सुधारणा केलेले विधेयक गुरुवारी विधानसभेत प्रदीर्घ चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळाने याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यासाठी महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती अधिनियम -१९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला गेला. 

 

हेही वाचा, 
यवतमाळ: ‘प्रहार’च्या धमाकेदार ‘एन्ट्री’मुळे काँग्रेस, भाजप, शिवसेनेचा पराभव

बातम्या आणखी आहेत...