आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेत लवकरच ६१८ पदांची भरती, सर्वाधिक पदे लिपिकांची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- रिक्त झालेल्या पदांवर नव्याने नियुक्ती न केल्याने आजघडीला महापालिकेतील ६१८ पदे रिक्त आहेत. ही पदे लवकरच भरली जाण्याची शक्यता असून याच महिन्यात भरती प्रक्रिया सुरू होऊ शकेल. वर्ग एक ते चारपर्यंतची ही रिक्त पदे असून त्यातील सर्वाधिक पदे (३८५) वर्ग तीनची आहेत. 


मनपात सध्या   आऊटसोर्सिंगद्वारे ११०० कर्मचारी घेण्यात आले आहेत. एवढे कर्मचारी का घ्यावे लागले, असा प्रश्न समोर आला तेव्हा गेल्या अनेक वर्षांपासून येथे भरती झाली नसल्याचे समोर आले. त्यामुळे ६१८ जागा रिक्त आहेत. या जागा जर कायमस्वरूपी भरल्या गेल्या तर आऊटसोर्सिंगद्वारे एवढे कर्मचारी घेण्याची गरज पडणार नाही. 


पुढील वर्षी सर्वाधिक अधिकारी निवृत्त होणार : महापालिकेची स्थापना झाल्यानंतर १९८४ ते ८८ या काळात भरती झालेले िकमान ५०० अधिकारी, कर्मचारी २०१९ मध्ये निवृत्त होणार आहेत. २००८ मध्ये मनपात ५२ पदांची भरती करण्यात आली होती. त्यानंतर भरतीच झालेली नाही. जास्तीच्या कर्मचाऱ्यांची गरज असल्याने ७५० नवीन पदांचा आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. यास मान्यता मिळाल्यानंतर भरती होईल. परंतु आता रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी राज्य शासनाच्या मान्यतेची गरज नाही. त्यामुळे ही भरती का केली नाही, असा सवाल डॉ. निपुण विनायक यांनी केला. तेव्हा लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू करावी, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. 


अनेकांना मिळणार पदोन्नतीची संधी 
या भरतीत वर्ग १ ची ९ पदे आहेत. अर्थात ही पदे पदोन्नतीने भरली जातील. त्यामुळे आपोआपच वर्ग- २ ची पदे रिक्त होतील. म्हणजे ही पदे भरावी लागतील. यातील पदे पदोन्नतीने भरली जातील म्हणजे वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी लागेल. त्यांच्या जागेवर वर्ग- ४ च्या काहींना पदोन्नती मिळेल. म्हणजे या भरतीच्या निमित्ताने अनेकांना पदोन्नतीची संधी चालून आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...