आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात महिनाभरात वाढली 7400 शेततळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यात १० जून अखेर  ८७ हजार २१ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. १० मे  रोजी ही संख्या ७९६१४ इतकी होती. महिन्याभरात ही संख्या ७ हजार ४०७ ने वाढली आहे. ‘दिव्य मराठी’ने महाराष्ट्रात शेततळ्याची गती मंदावल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. यामध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या नगर जिल्ह्यात शेततळ्याची संख्या वाढत असताना दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या औरंगाबादची गती मंदावल्याचे प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी  त्याची दखल घेत जिल्ह्यात सातत्याने आढावा घेतल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात शेततळ्याची संख्या १३१० ने वाढून ८२३०  झाली आहे. तर नगर जिल्हा अजूनही पहिल्या क्रमांकावर असून नगरमध्ये ही संख्या ८४३६ इतकी आहे. 


 राज्यात ९ मार्च रोजी  औरंगाबाद जिल्ह्यात ६३७४ शेततळे होती. तर ११ मे रोजी रोजी ६९२० इतकी शेततळी झाली होती. तर  नगर जिल्ह्यात ९ मार्च रोजी ६८७५ शेततळ्याची संख्या  ११ मे रोजी ८३३० इतकी झाली होती. दोनच महिन्यांत  नगर जिल्ह्यात १४४५ शेततळी तर औरंगाबाद जिल्ह्यात फक्त फक्त ५४६ शेततळे झाल्याचे ‘दिव्य मराठी’ने तुलना करत औरंगाबादचे वास्तव समोर आणले होते.त्यानंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सातत्याने याचा आढावा घेतला. त्याचा परिणाम जिल्ह्यात ८२३० शेततळी पूर्ण झाली  आहेत .यामध्ये औरंगाबाद  तालुका १४०२, पैठण १३१७, फुलंब्री ३२०, वैजापूर १९६१,  गंगापूर १०४२,  खुलताबाद २९०,   सिल्लोड १३१४, कन्नड ४९८ आणि   सोयगाव तालुक्यात ८६ शेततळी झाली आहेत.  महिनाभरात ही संख्या १३१० ने वाढली आहे. तर नगर जिल्ह्यात आता शेततळ्यांची संख्या ८४३६ झाली आहे. गेल्या महिनाभरात नगरमध्ये  केवळ १०६ शेततळे झाली आहेत. त्यामुळे यापूर्वी १४१० चा असलेला फरक अाता केवळ २०६ इतका उरला आहे. 

 

मराठवाड्यात ३० हजार शेततळी पूर्ण 
मराठवाड्यात ३० हजार ६४१ शेततळी पूर्ण झाली आहेत. यामध्ये जालना ६४५० बीड ६२९३ उस्मानाबाद २२६७, लातूर १६८८,परभणी १७६९ हिंगोली २२०१, नांदेड १७४३ शेततळे झाली आहेत. महिनाभरात  जालना जिल्ह्यात ७५४ तर बीड जिल्ह्यात ६४७, लातूर ६००, हिंगोली ३४३,नांदेड १७३ आणि   परभणी जिल्ह्यात सर्वात कमी केवळ १२५ ने ही  संख्या वाढली आहे. 

 

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात वाढताहेत शेततळी  
बीड, यवतमाळ, अमरावती या   शेतकर आत्महत्याग्रस्त  भागात शेततळ्याची संख्या वाढत आहे.   अमरावतीमध्ये महिन्यापूर्वी ३९३६ असलेली शेततळ्यांची संख्या  ४५४१,   यवतमाळमध्ये ५३९३  असलेल्या शेततळ्याची संख्या ६०६६, तर ३७९० शेततळ्यांची संख्या असलेल्या  बुलडाणामध्ये  ४१९२,   तर बीड ६२९३,  जालना ५९८७ शेततळी झाली आहेत. (स्रोत : कृषी विभाग)

 

बातम्या आणखी आहेत...