आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलंब्री पहिल्या नगरपंचायतीसाठी 75 टक्के मतदान; सकाळी 10 वाजेपासून निकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री- फुलंब्री  नगरपंचायतीच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीसाठी चुरशीने ७५ टक्के मतदान शांततेत पार पडले. तीस महिन्यांपासून विविध कारणांमुळे रखडलेली निवडणूक व्हावी, अशी फुलंब्रीकरांची इच्छा होती.   


फुलंब्री ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होऊन जवळपास तीस महिन्यांचा कालावधी होत आला. दरम्यान, यापूर्वी नगरपंचायतीची निवडणूक प्रशासनाने जाहीर केली होती. परंतु नगरपंचायत निवडणूक विविध कारणांनी रखडलेली होती. त्यानंतर निवडणूक जाहीर करण्यात आली. 


मतदान शांततेत पार पडले. सकाळी साडेसात वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी साडेपाचपर्यंत सुरू राहिले. या कालावधीत भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या फुलंब्री विकास आघाडीने मतदारांना आणून मतदान करवून घेण्यासाठी सर्व यंत्रणा राबवली होती. अगदी वयस्कर व्यक्तीला  खबरदारी घेऊन उचलून आणून मतदान करवून घेण्यात आल्याचे चित्र दिसून आले. नगरपंचायतीची पहिली ऐतिहासिक निवडणूक प्रामुख्याने  भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची फुलंब्री विकास आघाडी यांच्यात लढवली गेली.  


शहरात एकूण १७ प्रभाग असून एकूण मतदारांची संख्या १४,१२४  आहे. आज सायंकाळी साडेपाचपर्यंत १०६१६ इतके मतदान झाले. निवडणुकीसाठी सकाळच्या सत्रात चांगल्या प्रकारचा वेग मतदानाला राहिला होता. त्यानंतर मतदानाचा वेग दुपारी काहीसा मंदावला होता. मतदानादरम्यान पोलिस यंत्रणेने त्यांची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली. एकंदरीत शांतता व सुव्यवस्थेच्या वातावरणात मतदान यंत्रणा पार पडली. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून सुहास शिरसाठ व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या फुलंब्री विकास आघाडीकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे शिरसाठ व ठोंबरे यांच्यातील लढत चुरशीची ठरणार आहे. फुलंब्री नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदाचा पहिला मान कुणाला मिळतो, हे उद्याच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.  उर्वरित १७ सदस्यांसाठी एकूण ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाल्याने त्यांची धाकधूक वाढली आहे. आज १० वाजेपासून निकाल जाहीर होणार आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, वाॅर्डनिहाय झालेले मतदान...  

बातम्या आणखी आहेत...