आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यु-टयूबवरील ब्राह्मण समाजाबाबत आक्षेपार्ह गाणे: दोघांविरोधात गुन्‍हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राह्मण समाजाबाबत आक्षेपार्ह गाणे प्रसारित करणा-या मुंबईतील कलाकारांविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्‍याच्‍या मागणीसाठी पुरोहित संघटनेने बुधवारी पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेतली होती. - Divya Marathi
ब्राह्मण समाजाबाबत आक्षेपार्ह गाणे प्रसारित करणा-या मुंबईतील कलाकारांविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्‍याच्‍या मागणीसाठी पुरोहित संघटनेने बुधवारी पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेतली होती.

औरंगाबाद -  यू-ट्यूबवर ब्राह्मण समाजाबाबत आक्षेपार्ह गाणे प्रसारित करणारा मुंबईतील गायक आणि गीतकाराविरूद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुरोहित संघटनेने मंगळवारी तक्रार दाखल केली होती. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींना लगाम लावण्यासाठी या कलाकारांनी जाहीर माफी मागण्याची मागणी पुरोहित संघटनेने केली आहे.  
                 

मुंबईतील कलाकार सचिन म्हस्के आणि राजरत्न सावंत यांनी तयार केलेले भटाची मस्ती जिरवायची हे गाणे काही दिवसांपासून यू-ट्यूबवर सुरू होते. त्यास ५० हजाराहून नागरिकांनी बघितले. ही बाब औरंगाबाद पुरोहित संघटनेला समजताच मंगळवारी सिडको पोलिस ठाण्यात दोन्ही कलाकारांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. तर बुधवारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष मुळे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली कलाकारांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेतली.  


गुन्हा दाखल
पुरोहित संघटनेच्या तक्रारीवरून बुधवारी रात्री सचिन म्हस्के आणि राजरत्न सावंत यांच्याविरुद्ध कलम २९५ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर यू-ट्यूबनेही गाणे काढून घेतले. हा ब्राह्मण समाजाच्या एकीचा विजय असल्याचे मुळे गुरुजी यांनी म्हटले आहे. यासाठी आशिष सुरडकर, आनंद तांदूळवाडीकर, स्वप्निल जोशी, स्वप्निल पैठणकर, युवराज दिवेकर, रवी माहोरकर, मिलिंद पिंपळे, सुधीर नाईक, सचिन वाडे पाटील, अनिल पैठणकर, अभिषेक कादी, वनिता पत्की, विजया कुलकर्णी, अंजली गोरे, गीता आचार्य, सुरेखा पारवेकर, मेघा दिवेकर, माधुरी जोशी, मयुरी जोशी, अनिरुद्ध देशमुख, रामदूत मुळे, अक्षय तांदुळजे, संतोष पटवर्धन, आनंद मुळे, आदींनी पोलिस आयुक्तांचे आभार मानले आहे.

 

अटक करा, माफी मागा
सुभाष मुळे गुरुजी म्हणाले, यू-ट्यूब वरील गीतात दोन समाजात तेढ निर्माण करणारी विधाने आहेत. दोन्ही समाज बांधव एकोप्याने नांदत असताना अशा गीतांमुळे विनाकारण वाद निर्माण होऊ शकतात. अशा प्रवृत्तींना लगाम लावण्यासाठी संघटनेने गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, एवढ्यावर थांबणार नसून दोन्ही कलाकारांनी माफी मागण्याची तसेच अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...