आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाथ दर्शनासाठी दक्षिण काशीत महिला वारकऱ्यांचा मेळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- सव्वाचारशे वर्षांपासून अखंड सुरू आहे तो सोहळा नाथषष्ठीचा.  कोणतेही निमंत्रण नसते, कुणी आग्रहही करत नाही. तरीही भक्तीने भारलेल्या लाखो वैष्णवांची मांदियाळी तीन दिवसांसाठी एकवटते अन् दरवर्षी भक्तीचा हा सोहळा एक नवा इतिहास रचते. असा हा दिव्य सोहळा आपल्या नजरेने एकदा पाहावा हीच अपेक्षा....  तुझे दर्शन घेतो रांगेने.. एकनाथ मुखी नाव तुझे, ओढ तुझी झाले दर्शन आता समाधानीही भाविक...  अशी अवस्था नाथषष्ठीत आलेल्या चार लाखांहून अधिक भाविक वारकऱ्यांची झाली होती. मंगळवारी रात्रीपासून दर्शनासाठी रांगा लागल्या. यंदा प्रथमच पती- पत्नीला एकत्र दर्शन घेता आले.  


पैठणच्या यात्रेत पहिल्यांदाच सत्तर टक्के महिला वारीत सहभाग दिसून अाला असल्याची माहिती ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी सांगितले.  या महिला पायी दिंडीतून सहभागी असून आपआपल्या फडावर त्या भजन कीर्तन, प्रवचन करत आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा वारीत महिला वारकऱ्यांची संख्या वाढली असून गतवर्षी ही संख्या ६० टक्क्यांवर असल्याची माहिती समोर आली आहे.   


नाथ मंदिरात पहिल्यांदाच महिला- पुरुष वारकरी एकत्र दर्शन 

वारीत समानता असताना दर्शन वेगळे का? याचा विचार करून यंदा नाथ संस्थानाने महिला वारकरी व पुरुष वारकरी यांच्या एकच रांगेत दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यातून पती-पत्नीचे एकत्र दर्शन तर होतच होते शिवाय एकाचे दर्शन झाल्यावर दुसऱ्याची वाट पाहावी लागत होती. यातून मोठा गोंधळ होत होता. आता मात्र संस्थानाने महिला व पुरुष वारकऱ्यांना एकत्र दर्शन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  


 एकोपाचे दर्शन घडू दे एकनाथा... असे वास्तव आज पैठणच्या वारीत पुरुष वारकऱ्यांच्या संख्येपेक्षा अधिक महिलांची संख्या पाहता तंतोतंत योग्य ठरत आहे.  नाथषष्ठीत महिलांचा सहभाग वाढल्याने  खऱ्या अर्थाने समता वारीत दिसली आहे. आज जागतिक महिला दिनी हे समानतेचे दर्शन नाथ नगरीत पाहायला मिळाले.  

 

फडात शारदाबाईंचे कीर्तन   
बीड जिल्ह्यातील बनकर स्वामी यांच्या दिंडीत मागील दहा वर्षांपासून सहभागी होणारी महिला वारकरी शारदा मापारी यांचे कीर्तन या दिंडीतील वारकऱ्यांना नवी ऊर्जा देणारे ठरत आहे. त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याने वारीत महिला वारकऱ्यांची वर्णी सुखद असून महिलांना खऱ्या समानतेकडे घेऊन जाणारी आहे.   मापारी यांही वारीतून मनशांती मिळत असल्याचे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...