आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता ओलांडताना कंटेनरची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू; देवळाई चौकात दुपारी अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- काम आटोपून घरी परतणाऱ्या बांधकाम मजुराचा भरधाव कंटेनरच्या मागील चाकाखाली येऊन मृत्यू झाला. भास्कर तोताराम आढाव (४५, रा. सातारा गाव) असे मृत मजुराचे नाव आहे. बुधवारी दुपारी अडीच ते पावणेतीनच्या सुमारास देवळाई चौकात हा अपघात झाला. अपघात होताच सातारा पोलिसांनी कंटेनरचालक रामकिशन शिंदे (रा. लातूर) याला अटक केली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आढाव अनेक वर्षांपासून मिस्त्री काम करत होते. सातारा गावात पत्नी, दोन मुले व मुलीसह ते राहत होते. बुधवारी देवळाई परिसरातच त्यांचे काम सुरू होते. ते पूर्ण झाले असल्याने पोत्यातून बांधकाम साहित्य घेऊन निघालेल्या आढाव यांनी शिवाजीनगरकडून देवळाई चौकातून साताऱ्याच्या दिशेने वळण घेतले. याच वेळी झाल्टा फाट्याकडून येणारे कंटेनर (एमएच २८ बीबी ०५७३) चौकातून जात होते. वेगात असलेल्या या कंटेनरचा आढाव यांना अंदाज आला नाही, कंटेनरचा धक्का लागून ते थेट मागील चाकाखाली आले. यात डोक्याला गंभीर इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. सातारा पोलिस ठाण्याचे शेषराव चव्हाण व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आढाव यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात नेला. 


चालक ताब्यात 
अपघातानंतर जमावाकडून मारहाण होण्याच्या शक्यतेमुळे कंटेनरचालक कंटेनर चौकातच थांबवून निघून गेला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी कंटेनर बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. काही जणांनी चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु सातारा पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. 

बातम्या आणखी आहेत...