आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात वाहनाच्या धडकेने फतियाबादचा युवक ठार; औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दौलताबाद- अज्ञात वाहनाच्या धडकेने युवकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री १० च्या सुमारास औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील माळीवाडा गावाजवळील आयुष पेट्रोल पंपासमोर घडली. ज्ञानेश्वर तुकाराम पल्हाळ (२१, रा. फतियाबाद, ता. गंगापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. कुटुंबीयांसह फतियाबाद येथे राहणारा ज्ञानेश्वर मोठ्या भावासोबत शेती करत होता. मंगळवारी शेतातील कामे आटोपून दोघे घरी आले. 


संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ज्ञानेश्वर नव्या दुचाकीवरून माळीवाडा येथे गेला होता. तेथून परतताना माळीवाडा गावाजवळील आयुष पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. गावातील युवकांकडून अपघाताची माहिती मिळताच त्याचे भाऊ भाऊसाहेब पल्हाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांच्या मदतीने ज्ञानेश्वरला घाटीत दाखल केले. तेथे रात्री १२ च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी दौलताबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक संजय मांटे तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...