आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरुळ : घृष्णेश्वर महादेव मंदिरात आधिक मासानिमित्त अतिरुद्र अभिषेक संपन्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरुळ -  आधिक मासानिमित्त वेरुळ येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेवास करण्यात आलेल्या यंदाच्या अतिरुद्र अभिषेक सोहळयाची समाप्ती शुक्रवारी करवीर पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी , समाजरत्न श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज , विद्यावामदेवानंद तीर्थस्वरूप टाकास्वामी वेरुळ यांच्या हस्ते झाली आधिक मासानिमित्त दी 4 जून ते 8 जून या दरम्यान भगवान घृष्णेश्वरास कुशाचा बारावा अतिरुद्र जलाभिषेक करण्यात आला असून या मध्ये 251 ब्रम्हवृंदाच्या मंत्रघोषात अखंडित अहोरात्र चाललेल्या अतिरुद्र ह्या पूजा प्रकारात 14641 अभिषेक झाले म्हणजे 11 महारुद्र संपन्न झाले तर या अतिरुद्राचे आचार्य पद राक्षसभुवन ( शनीचे ) येथील अशोक पाठक यांनी भूषविले  या ब्रम्हवृंदामध्ये श्रवण चंद्रकांत जोशी वय 9 वर्षे वेरुळ व शंकर संदीप जोशी वय 8 वर्षे मानवत हे सर्वात लहान बटु मंत्रपठन करीत होते.

 

याचबरोबर या काळात मंदिरामध्ये गणपती अथर्वशीर्ष , सप्तशती , महामृत्युंजय जप , घृष्णेश्वर भगवान जप , ज्ञानेश्वरी पारायण , गुरुचरित्र पारायण , नवग्रह जप , नवनाथ पारायण सह विविध पूजापाठ संपन्न झाले असून या काळात बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव भगवानांचे गाभारा दर्शन भाविकाना बंद ठेवण्यात आले होते तर भाविक या काळात सभामंडप मधून देवाचे दर्शन करीत होते तर शनिवार सकाळ पासून भाविकाना परंपरे नुसार गाभारा दर्शन खुले होणार आहे तर समाप्ती वेळी मंदिर सभामंडप मध्ये सूर्यकांत सन्नानसे यांनी तांदळा पासून सर्वतोभद्र मंडल  बनविले होते तर या समाप्ती वेळी धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले , गुरूकृपा फरसाण मार्टचे मालक राजेन्द्र पवार , विष्णु महाराज , शिवा अंगुलगावकर , अध्यक्ष दीपक शुक्ला , कार्यकारी विश्वस्त कमलाकर विटेकर , अतिरुद्र समिती अध्यक्ष परेश पाठक , मुख्य पुजारी रवी पुराणिक , व्यवस्थापक संजय जोशी , तंटा मुक्ति अध्यक्ष नाना ठाकरे , पोलिस पाटिल रमेश ढिवरे , संजय मधुकर वैद्य , राजेंद्र कौशिके , संजय दादाराव वैद्य , गणेश वैद्य , अनिल जोशी , अनिल देवपाठक , वकिल मिलिंद जोशी , योगेश टोपरे , शशांक टोपरे , गुरुबचनसिंह हजारी , गणेशसिंह हजारी , चंद्रकांत शेवाळे , रावसाहेब दांडगे यांच्यासह देवस्थान समिती सदस्य , अतिरुद्र समिती सदस्य समस्त ब्रम्हवृंद यांच्यासह ग्रामस्थ भाविकांची मोठी उपस्थिति होती तर शनिवारी दुपारी 11 . 30 वाजता समस्त ब्रम्हवृंद व ग्रामस्थ यांच्या उपस्थिती मध्ये भगवान घृष्णेश्वरांची प्रक्षाल पूजा व चंदन लेपन संपन्न होणार आहे. 
 
अतिरुद्र निमित्त मोठ्या प्रमाणावर दानधर्म
आधिक मासानिमित्त संपन्न झालेल्या अतिरुद्र निमित्त शुक्रवारी 37 विकलांगाना वस्त्र वाटप , शिधा ( साखर , गहु , तांदूळ व कणिक ) वाटप करण्यात आले तर 551 गरीब महिलांना साड़ी वाटप , गरीब , विकलांग , अल्पभुधारक 1111 शेतकऱ्यांना वस्त्र दान , औरंगाबाद येथील भगवानबाबा अनाथ आश्रमास  अकरा हजार रूपयाची रोख रक्कम व एक कट्टा साखर , तांदूळ , बेसन व तुर दाळ देण्यात आली तर या काळात दत्ताजी भाले रक्तपेढी व देवस्थान ट्रस्ट मार्फत रक्तदान शिबीर घेण्यात आले तर यावेळी उपस्थिताना देवस्थान ट्रस्टची या आधिची सामाजिक कार्ये उपस्थिताना सांगताना माजी कार्यकारी विश्वस्त योगेश टोपरे यांनी सांगितले की देवस्थान ट्रस्टने याआधी रक्तदान शिबिरे , आठवड्यातुन चार दिवस गरीब रुग्णासाठी मोफत वैद्यकीय सेवा व मोफत औषध वाटप , गेल्या विस् वर्षापासून एका कैंसर पीडिताचा खर्च , येळगंगा नदीचे खोलिकरणास हातभार , वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन तसेच संगोपन उपक्रम , भोसले समाधी स्थळानची स्वच्छता , गरीब कुटुंबियाना विवाहासाठी निशुल्क मंगल कार्यालय , सर्व धर्मीय विवाह सोहळयास आर्थिक मदत , विकलांगाना सायकल वाटप , भाविकासाठी दररोज दुपारी प्रसाद वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले तर आगामी काळात परिसरातील 100 गरीब व होतकरु विद्यार्थाना पुस्तके व शालेय साहित्य वाटप , गरीब व्यक्तिना मोफत वैद्यकीय तपासन्या तसेच दररोज दुपारी मंदिरात प्रसाद म्हणून जेवन वाटप करण्याचा मानस असल्याचे सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...