आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या औद्योगिक ग्राहकांसाठी अभय योजना सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वीज बिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील ९७,४६४ ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ होईल. त्याद्वारे २३१ कोटींची व्याज व विलंब आकारावरील सवलत मिळवता येईल.    


ही योजना १ जून ते ३१ ऑगस्ट २०१८ दरम्यान असेल. ३१ डिसेंबर २०१७  पूर्वी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांनी योजनेच्या पहिल्या महिन्यात मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास त्यांना १००  टक्के व्याज व विलंब आकाराची सवलत मिळेल. १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०१८ दरम्यान मूळ थकबाकीची रक्कम व व्याजाची २५ टक्के रक्कम भरली तर उर्वरित ७५  टक्के व्याज व १०० टक्के विलंब आकाराची माफी ग्राहकाला मिळणार आहे.

 

कसा करावा भरणा  
ग्राहकाला थकबाकीची रक्कम रोख /नेटपेमेंट/चेक या माध्यमातून करता येईल. थकबाकीची रक्कम भरल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार संबंधित ग्राहकाला वीजजोडणी देण्यात येईल.  महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ग्राहकांच्या थकबाकीचा तपशील मिळेल. ‘AMENESTY SCHEME २०१८ या लिंकवर ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट टाकावे. या योजनेत १  जून २०१८ पासून ग्राहकांना सहभागी होता येईल. 

 

बातम्या आणखी आहेत...