आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; 6 ते 8 प्रवासी जखमी, 2 गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड- मुंबईहून कोल्‍हापूरच्‍या दिशेने येत असलेल्‍या खासगी बसचा आज सकाळी 4 वाजेच्‍या दरम्‍यान भीषण अपघात झाला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर पुलाच्या कठड्याला या बसची धडक बसल्‍याने हा अपघात झाला. सुदैवाने यादरम्‍यान बस नदीत पडली नाही, त्‍यामुळे मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले असून 6 ते 8 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.    


हा अपघात सकाळी चारच्या सुमारास वाकड येथील मुळा नदीच्या पुलावर घडला. मुंबई वरून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या खाजगी बसची (क्रं. MH 09 CV 3697) वाकड परिसरात मुळा नदीच्या पुलाच्या कठड्याला धडक बसली. सुदैवाने बस नदीत न कोसळता पुलाच्या पुढे जाऊन डाव्या बाजूला उलटली. बस मध्ये ऐकून 30 प्रवासी होते.  यातील 6 ते 8 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. तर बेलापूर कोर्टाच्या न्यायधीश चंद्रशिला सचिन पाटील गंभीर जखमी झाले आहेत. या शिवाय चार वर्षीय चिमुरडी स्वरा पाटील गंभीर जखमी असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

 

 

बातम्या आणखी आहेत...