आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ दिवस उलटले, बाभूळगावच्या बेपत्ता जवानाचा शोध लागेना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर तालुक्यातील बाभूळगावात बेपत्ता जवानाचे कुटुंबीय चिंताग्रस्त. इन्सेट जवान नवनाथ चोपडे. - Divya Marathi
वैजापूर तालुक्यातील बाभूळगावात बेपत्ता जवानाचे कुटुंबीय चिंताग्रस्त. इन्सेट जवान नवनाथ चोपडे.

गारज -  सैन्य दलात देश सेवेसाठी गेलेल्या आसाम न्यू मिसामारी लांबा कॅम्प युनिट ६२६ मधील नवनाथ गजानन चोपडे जवान हा आसाम येथील रंगीया रेल्वे स्थानक येथून  गुवाहाटी ते मुंबई  रेल्वे मार्गाने पत्नी व दोन मुलासोबत  पंधरा दिवसांच्या सुटीवर गावी येत असतानाच तो मध्य प्रदेशमधील जबलपूर रेल्वे   स्थानकाहून अचानक बेपत्ता झाल्याची घटना १७ मे रोजी घडलेली असून आठ दिवस उलटून गेले असतानाही या जवानाचा अजूनही शोध लागलेला नाही .  
औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या वैजापूर तालुक्यातील बाभूळगाव बुद्रुक येथील जवान हा आपल्या परिवारासोबत पंधरा दिवसाची रजा टाकून गावाकडे येत होता दरम्यान मध्य प्रदेशमध्ये असलेल्या जबलपूर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर मुलांना पाणी बॉटल घेण्यासाठी रेल्वेतून खाली उतरला व अचानक बेपत्ता झाला. पत्नी मंगल हिने बराच वेळ झाला तरीही  पती येत नसल्याने शोधाशोध केली परंतु रेल्वेने  स्थानक सोडलेले होते.

 

दरम्यान त्याच डब्यात असलेल्या प्रवाशांना विचारणा केली असता ते बाहेर गेले एवढेच माहिती असल्याचे पत्नी मंगल यांना सांगितले.  मोबाइल फोन, ओळखपत्र ,आधार, पॉकेट हे सर्व  त्यांनी बॅगमध्ये ठेवलेले होते. त्यामुळे पत्नी मंगल यांचा त्यांच्यासोबत कुठलाही संपर्क होऊ शकला नाही.  


 घाबरलेल्या अवस्थेत जवान नवनाथ चोपडे यांच्या पत्नी या दोन मुलांना घेऊन गावी आल्या तेव्हा त्यांनी सर्व हकिकत घरच्यांना सांगितली. आई, वडील, भाऊ गणेश व केदार यांनी  दोन दिवस वाट बघितली परंतु नवनाथ यांचा काहीच पत्ता न लागल्याने  त्यांनी थेट  जबलपूर गाठले.  रेल्वे पोलिस व स्थानिक पोलिस ठाणे यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली, परंतु काही पुढाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली गेली.

 

  दरम्यान नवनाथ चोपडे यांच्या पत्नी व  नातेवाइकांनी आसाम न्यू मिसामारी लांबा कॅम्प युनिट ६२६ मधील अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यासाठी संपर्क साधला असता  तुम्ही सुटी वाढवण्यासाठी हे कारण देत आहात म्हणून कानाडोळा केला. परंतु जबलपूर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  

बातम्या आणखी आहेत...