आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्काराच्या गुन्ह्यातून जामीन मिळताच पुन्हा तिलाच पळवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नऊ महिन्यांपूर्वी १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेत बलात्कार करणाऱ्याने त्या गुन्ह्यातून जामिनावर सुटताच पुन्हा त्या मुलीला पळवून नेले. इब्राहिम बेग नूर (४०, रा. चिकलठाणा) असे आरोपीचे नाव असून मुलीच्या वडिलांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 


१५ फेब्रुवारी रोजी बेगला जामीन मंजूर झाला. ३ जुलै रोजी पीडिता दुपारी ४.३० वाजता कामानिमित्त बाहेर गेली होती. मात्र ती परत आलीच नाही. त्यामुळे कुटुंबीयांना पुन्हा बेगवर संशय आला. मुलीच्या वडिलांनी पुंडलिकनगर ठाणे गाठत बेगने मुलीला पळवून नेल्याची तक्रार दिली. नोव्हेंबरमध्ये त्याच्यावर अपहरणासह बलात्कार व अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे निरीक्षक एल. ए. शिंगारे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...